Monday, June 17, 2024

‘ब्रह्मास्त्र पार्ट 2: देव’ मध्ये झळकणार का हृतिक रोशन? स्वत:च केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांचा ब्रह्मास्त्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2: देव’ असे ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे नाव राहणार आहे. कोण असेल अभिनेता? हृतिक रोशन अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. आता यावर हृतिक रोशनची प्रतिक्रिया समोर आली आहे. अयान मुखर्जी (Ayan Mukerji) याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.

काय म्हणाला हृतिक?
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या पहिल्या भागात रणबीरने शिवा आणि आलियाने ईशा ही भूमिका साकारली आहे. आता अयान याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देव या भूमिकेची कथा दाखवणार आहे. एका मुलाखती दरम्यान हृतिकला ब्रह्मास्त्र-2 चित्रपटातील भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. हृतिक म्हणाला की,’मी या चित्रपटाशी जोडला गेलोय, पण त्याबद्दल अधिक आताच सांगता येणार नाही.’ ब्रह्मास्त्र-2 हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे. याचित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. ब्रह्मास्त्रसोबतच हृतिक रोशन हा नितेश तिवारीच्या ‘रामायण’ चित्रपटात देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना हृतिक म्हणाला, ‘याबाबत मला माहित नाही, पण पुढचा प्रोजेक्ट फायटर हा असेल’

हृतिकचे आगामी चित्रपट
फायटर या चित्रपटात ह्रतिकसोबत दीपिका पादुकोण,अनिल कपूर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद हे कराणार आहेत. हृतिकचा विक्रम वेधा हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. ‘विक्रम वेधा’ या सिनेमात हृतिक रोशन आणि सैफ अली खानसह राधिका आपटे आणि योगिता बिहानी, रोहित सराफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा 2017 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या एका तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हृतिकच्या आगमी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रह्मास्त्र 2 2025 मध्ये रिलीज होणार आहे
दरम्यान, अयान मुखर्जीने सांगितले आहे की तो 2025 मध्ये ब्रह्मास्त्र भाग 2 प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त, पहिल्या भागात अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्या व्यतिरिक्त मौनी रॉय, शाहरुख खानचा विस्तारित कॅमिओ आणि दीपिका पदुकोणने विशेष भूमिका साकारल्या होत्या. आणि डिंपल कपाडिया. हा 9 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री रसिकासाठी नवरात्र आहे खूपच खास, 250 नेत्रहीन मुलींसोबत लुटला गरब्याचा आनंद
इंडियन आयडॉलवर संतापले प्रेक्षक, थेट बॉयकॉट करण्याची केली मागणी

हे देखील वाचा