‘मेंटलहुड’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिजमध्ये काम केलेला अभिनेता डीनो मोरिया अभिनयाकडे परतण्यासाठी त्याकडे एखाद्या सरावासारखे पाहत आहे. आता लवकरच तो ‘द एम्पायर’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. डिस्जी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणाऱ्या शोमध्ये तो मुघल शासक मुहम्मद शायबानीची भूमिका साकरताना दिसेल. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डीनो मोरियाने अभिनयात परतणे, ‘हेल्मेट’ चित्रपटाच्या निर्मिती आणि त्याच्या आयुष्याबद्दलचे विचार शेअर केले आहेत.
हे पात्र समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात साकारण्यासाठी तुमची प्रक्रिया काय होती?
या प्रश्नाचे उत्तर देताना डीनो म्हणाला, “मी पात्राचे जग आणि त्याची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या दिवशी मी पात्र पूर्ण करतो, त्या दिवशी मी त्यातून पूर्णपणे बाहेर पडतो. मी दोन वर्षांपासून मुहम्मद शायबानीच्या पात्रासोबत राहिलो आहे. मुहम्मद शायबानी दुष्ट आणि चलाख होता. त्याला असे वाटायचे की, सिंहासन गमावले नाही, तर कमावले जाते. हे पात्र समजून घेण्यासाठी मी ‘ब्लॅक पॅंथर’बद्दल वाचायला सुरुवात केली. त्याच्या हालचाली, हल्ला करण्याचे मार्ग समजून घेतले.” विशेष म्हणजे, प्रत्येक सीनसाठी त्याने फोनमध्ये एक प्लेलिस्ट बनवली होती. प्रत्येक सीनआधी तो एक गाणे ऐकायचा आणि त्या मूडमध्ये पात्र साकारायचा.
शोमधील तुमच्या लूकची तुलना ‘पद्मावत’ चित्रपटातील रणवीर सिंगचे पात्र अलाउद्दीन खिलजीशी केली जात आहे. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?
या प्रश्नाचे उत्तर देताना डीनो म्हणाला, “चांगली गोष्ट म्हणजे माझी तुलना इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्याशी केली जात आहे. चांगल्या कलाकाराशी तुलना करणे हे कौतुकास्पद गोष्ट आहे.”
२२ वर्षांच्या कारकिर्दीत, नवीन इनिंग सुरू झाल्यासारखे वाटते का?
या प्रश्नाचे उत्तर देताना डीनो म्हणाला, “माझा शेवटचा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर मी जाणीवपूर्वक कामासाठी नकार दिला, कारण चांगले पात्र उपलब्ध मिळत. जेव्हा अभिनयापासून दूर होतो, तेव्हा मी स्वतः मध्ये खूप बदल केले. पूर्वी प्रेक्षकांनी मला रोमँटिक हिरो म्हणून पाहिले आहे, पण माझी नवीन शैली पूर्णपणे वेगळी आहे. ‘मेंटलहुड’ आणि ‘तांडव’ हे शो सात वर्षांनंतर सराव केलेल्या व्यायामासारखेच आहेत.
इंडस्ट्रीत राहण्यासाठी तुम्हाला वेगळा काही प्रयत्न करावे लागला का?
डीनो म्हणाला, “या इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते. याच कारणामुळे मी माझे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आणि ‘जिस्म २’ चित्रपट बनवला. त्यानंतर दिल्लीला जाऊन तिथे एक्टिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. मला वाटले की १५ चित्रपट केल्यानंतर पाहूयात क्लासमध्ये काय शिकवले जाते. नंतर मी थिएटरमध्ये काम केले. माझ्या दुसरा चित्रपट ‘हेल्मेट’ प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाला आहे.
तुम्ही सोशल मीडियावर फिटनेसशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करता, तर वाढत्या वयासोबत कोणती आव्हान येत आहेत?
डीनो म्हणाला, “वय माझ्यासाठी एक संख्येप्रमाणे आहे. आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जरी तुम्हाला जीवनात अडचणींनी घेरलेले असले, तरी नेहमी चांगले विचार करा.” तो म्हणतो की, स्वतःला तंदुरुस्त ठेवा, कोणताही खेळ खेळा, पण जे मेहनत करतात तेच पुढे जातात.
‘हेल्मेट’ चित्रपटाद्वारे तुम्ही चित्रपटनिर्मितीमध्ये परतला आहात. हा व्यवसाय किती बदलला आहे, असे तुम्हाला वाटते?
डीनो म्हणाला, “जेव्हा मी ‘जिस्म २’ ची निर्मिती केली, तेव्हा मी त्यात लाइन प्रोड्यूसर म्हणूनही काम केले. कुठल्या वस्तू स्वस्तात कशी मिळवायची ते मी खूप चांगले शिकलो. मी ‘हेल्मेट’सोबतच मी काम करण्याचे नवीन मार्ग देखील शिकत आहे.”
आता अभिनेत्याचे ‘द एम्पायर’ या वेब सीरिजमधील पात्र कसे असेल आणि ते प्रेक्षकांना किती पसंत पडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य