Saturday, December 7, 2024
Home मराठी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘या’ चित्रपटाचा नेटफ्लिक्सवर जलवा; टॉप-१० मध्ये आहे अव्वल क्रमांकावर

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘या’ चित्रपटाचा नेटफ्लिक्सवर जलवा; टॉप-१० मध्ये आहे अव्वल क्रमांकावर

नवी दिल्ली। नेटफ्लिक्स या ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर मागील काही काळापासून बॉलिवूड सुपरस्टार नवाजुद्दीन सिद्दीकीचा जलवा पाहायला मिळत आहे. आधी त्याचा ‘रात अकेली है’ हा चित्रपट आला. त्यानंतर आता ‘सीरियस मेन’ रिलिझ झाला आहे. आता या नव्या चित्रपटाला नेटफ्लिक्स इंडियावर जोरदार पसंती मिळत आहे. सुधीर मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप- १० यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

‘सीरियस मेन’ ही एका व्यक्तीची कहाणी आहे, ज्याला आपल्या मुलाला मोठा माणूस बनवायचे आहे. या चित्रपटाबाबत सिद्दीकीने सांगितले होते की, तो दीर्घ काळापासून मिश्रा यांच्यासोबत काम करायचे होते. आता त्याला संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, ही सिद्दीकीची नेटफ्लिक्सवर हॅट्रिकच आहे. रात अकेली, सीरियस मेनव्यतिरिक्त वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चाही यामध्ये समावेश आहे. सिद्दीकीव्यतिरिक्त या चित्रपटात इंदिरा तिवारी, अक्षत दास, नासर, संजय नॉर्वेकर, श्वेता बसू प्रसाद यांचाही समावेश आहे.

नेटफ्लिक्सच्या टॉप-१० यादीत तिसऱ्या क्रमांकावर सर्वात विवादित वेब सीरिज बॅड बॉय बिलिनियर्स: इंडिया आहे. हीदेखील नुकतीच रिलिझ झाली आहे. याव्यतिरिक्त हिंदी भाषेत केवळ ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारें’चा समावेश आहे. कोंकणा सेन शर्मा आणि भूमि पेडणेकर यांचा समावेश असलेल्या या चित्रपटाला रिलिझ होऊन आता जवळपास २० दिवस झाले आहेत. यानंतरही या चित्रपटाला चांगला प्रेक्षकवर्ग मिळत आहे.

नेटफ्लिक्स टॉप-१० च्या पूर्ण यादीत अनेक भाषांमधील चित्रपट आणि वेब सीरिजचा समावेश आहे.

१. सीरियस मेन
२. एमिली इन पॅरिस
३. बॅड बॉय बिलिनियर्स: इंडिया
४. अमेरिकन असॅसिन
५. एनोला होईमस
६. फ्रेंड्स
७. डॉली किट्टी और वो चमकते सितारें
८. द लूझर्स
९. वंडर
१०. ल्युसिफर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा