यश चोप्रा यांना किंग ऑफ रोमान्स म्हटले जाते. त्यांना हे नाव त्यांच्या चित्रपट आणि कथांमुळे मिळाले, त्यांनी त्यांच्या चित्रपटात नायक-नायिकेच्या रोमांसला चालाना दिली. त्यांच्या चित्रपटांमध्ये नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी यांच्या नात्यावर चर्चा केली गेले. हिंदी चित्रपटांमध्ये फारच कमी नाती इतक्या खोलवर दाखवली जातात, जे यश चाेप्रा यांनी दाखवले. अशात यश चोप्रा यांचे तत्सम चित्रपट आणि त्यांचा प्रवास नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार्या द ‘रोमॅंटिक्स डॉक्युमेंट्री’मध्ये समाविष्ट करण्यात आला असुन आज म्हणजेच बुधवारी (दि. 1 फ्रेबूवारी)ला या सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
यश चोप्रा (yash chopra) आणि यशराज फिल्म्ससोबत काम केलेल्या सर्व बॉलीवूड कलाकारांशी झालेल्या संवादाची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, भूमी पेडणेकर, अभिषेक बच्चन, आयुष्मान खुराना आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचाही समावेश आहे.
ज्येष्ठ लेखक सलीम यांचे संभाषणही या डॉक्युमेंट-सिरीजचा एक भाग आहे. यासोबतच यशराज यांच्या आयकॉनिक चित्रपटांची झलकही यात सादर करण्यात आली आहे. आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा हे देखील डॉक्युमेंट-सिरीजचा एक भाग आहेत आणि ट्रेलरमधील फाेटाेंद्वारे ते दाखवले गेले आहेत.
चार पार्ट्सची डॉक्युमेंट् सीरीज स्मृती मुंद्रा यांनी दिग्दर्शित केली आहे. ही डॉक्युमेंट्री सीरीज 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे.
यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 रोजी झाला. प्रसिद्ध चित्रपट निर्माते बीआर चोप्रा यांचे धाकटे भाऊ, यशजी यांनी 1959 मध्ये ‘धूल का फूल’ या सामाजिक नाटकाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला.
पाच दशकांहून अधिक प्रवासात यश चोप्रांनी एकापेक्षा एक रोमँटिक चित्रपट दिले. त्यामध्ये ‘दाग’, ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘ये दिलगी’, ‘दिल तो पागल है’ या चित्रपटांचा समावेश आहे. यश चोप्रा यांचे 2012 मध्ये निधन झाले. शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा समाविष्ट असलेला ‘जब तक है जान’ हा त्याचा शेवटचा दिग्दर्शकीय चित्रपट आहे.(web series review the romantics official trailer out on yash chopra romantic movies megastar amitabh bachchan actor shah rukh khan actor salman khan actor ranbir kapoor seen)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अभिनेत्री श्रद्धा आर्यासाठी सासूने पाठवली खास भेट, फोटो शेअर करत सुनेने केले सासूचे कौतुक
माणसातल्या खऱ्या माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता संदीप पाठकचा ‘तो’ व्हिडिओ