Thursday, August 7, 2025
Home कॅलेंडर नव्या वर्षात ‘या’ वेबसिरीज आणि चित्रपटांचा असेल बोलबाला; पाहा प्रदर्शनाचे ठिकाण आणि तारखा

नव्या वर्षात ‘या’ वेबसिरीज आणि चित्रपटांचा असेल बोलबाला; पाहा प्रदर्शनाचे ठिकाण आणि तारखा

मागील २०२० वर्ष ओटीटी प्लेटफॉर्म्सच्या नावावर होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे २०२०च्या सुरुवातीलाच सर्व थिएटर अनियमित काळासाठी बंद केले गेले. त्यामुळे प्रदर्शनासाठी सज्ज असलेले अनेक चित्रपट प्रदर्शनाविनाच रखडले गेले.

अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी काही कालावधीनंतर ओटीटी प्लेटफॉर्म्सला मिळणारा प्रतिसाद बघता अनेक सिनेमे ओटीटी प्लेटफॉर्म्सवर प्रदर्शित केले. थिएटर बंद असल्यामुळे लोकांना मनोरंजनाचे साधनच उपलब्ध नव्हते. त्यामुळे ओटीटी प्लेटफॉर्म्सवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीज आणि चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहता, अनेक वेबसिरीज आणि सिनेमे ओटीटी प्लेटफॉर्म्सवर प्रदर्शित झाले.

त्यामुळे २०२० मध्ये ओटीटी प्लेटफॉर्म्सची चलती होती. आता २०२१ च्या सुरूवातीला जरी कोरोनाची दाहकता अथवा भीती कमी झाली असली तरीही अजून सरकारने पूर्णपणे नियम आणि बंधने शिथिल केलेले नाहीत. त्यामुळेच यावर्षी देखील ओटीटी प्ल‌ॅटफॉर्म्सला मोठ्याप्रमाणावर पसंती मिळणार आहे.

त्यामुळेच नव्या वर्षातही अनेक मोठे सिनेमे आणि वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणार आहे. चला तर मग पाहूया कोणते सिनेमे कधी प्रदर्शित होत आहे.

नेल पॉलिश :

जानेवारीच्या पहिल्याच तारखेला झी ५ वर बग्स भार्गव कृष्ण दिग्दर्शित ‘नेलपॉलिश’ सिनेमा प्रदर्शित होत आहेत. हा सिनेमा म्हणजे एक इंटेन्स कोर्टरूम ड्रामा आहे. यात अर्जुन रामपाल एका वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अर्जुनसोबत मानव कौल आणि आनंद तिवारी सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अर्जुन ३८ मुलांच्या खुनाचा आरोप असणाऱ्या आरोपीचा बचाव करताना दिसणार आहे.

कागज :

सतीश कौशिक दिग्दर्शित आणि सलमान खान निर्मित हा सिनेमा येत्या ७ जानेवारीला झी ५ वर प्रदर्शित होत आहे. यात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा खऱ्या कथेवर आधारित आहे. एका जिवंत व्यक्तीला सरकारी कागदपत्रात मृत घोषित केले जाते त्यामुळे तो व्यक्ती स्वतःची ओळख मिळवण्यासाठी लढत असतो.

मारा :

आर माधवन आणि श्रद्धा श्रीनाथ यांची मुख्य भूमिका असणारा मारा हा सिनेमा ८ जानेवारीला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा तेलगू असून मल्याळम चित्रपट ‘चार्ली’ चा रिमेक आहे.

द व्हाइट टाइगर :

प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव अभिनित द व्हाइट टाइगर हा सिनेमा २२ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या द व्हाइट टाइगर या कादंबरीवर आधारित आहे. रामिन बहरानी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमातून आदर्श गौरव सिने इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.

वेब सीरीज़

तांडव :

सेक्रेड गेम्सच्या भरगोस यशानंतर सैफ अली खान पुन्हा एकदा वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. १५ जानेवारीला अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये सैफ सोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर मोहम्मद ज़ीशान अयूब, तिग्मांशु धूलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पहूजा आणि शोनाली नागरानी महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. या सिरीजचे दिग्दर्शन अली अब्बास ज़फ़रने केले आहे.

saif ali khan Tandav
saif ali khan Tandav

जिद :

बोनी कपूर निर्मित झी ५ वर २२ जानेवारीला अमित साध आणि अमृता पुरी यांची जिद ही वेबसिरीज प्रदर्शित होत आहे.

हे देखील वाचा