कोरोनामुळे २०२० हे वर्ष ओटोटी प्लेटफॉर्म्सच्या नावावर राहिले. अनेक चांगल्या वेबसिरीज आणि सिनेमे २०२० मध्ये ओटोटी प्लेटफॉर्म्सवर प्रदर्शित झाले. थिएटर्स बंद असल्यानं लोकांनाही ओटोटी प्लेटफॉर्म्सच्या माध्यमातून मनोरंजनाचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
या वेबसिरीज आणि सिनेमांनी मनोरंजन क्षेत्राला अतिशय चांगले कलाकार दिले आहेत. ह्या कलाकारांनी त्याच्या अभिनयाने लोकांची मने तर जिंकली शिवाय त्यांना प्रसिद्धी देखील मिळाली. यासर्व कलाकारांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले, काही कलाकारांना तर त्यांच्या उतकृष्ट अभिनयासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पाहूया अशाच काही कलाकारांची नावे.
प्रतीक गांधी :
हर्षद मेहता यांचा बायोपिक असलेल्या स्कैम-1992 स्टॉप ब्रोकर या वेबसिरीजमधून दिग्दर्शक हंसल मेहता यांनी हर्षद मेहताचा संपूर्ण जीवनपट मांडला आहे. या वेबसिरीजमध्ये हर्षद मेहतांची भूमिका गुजराती कलाकार प्रतीक गांधी याने निभावली आहे.
प्रतीक हा गुजराती मनोरंजन क्षेत्रातील मोठे नाव आहे. मात्र या वेबसिरीजने त्याला संपूर्ण जगात ओळख दिली. ही वेबसिरीज सोनी लिव वर स्ट्रीम करण्यात आली आहे.
जितेंद्र कुमार :
अमेझॉन प्राईमच्या पंचायत या वेबसिरीजमध्ये जितेंद्र कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. गावातल्या राजकारणावर आधारित या सेरिजला खूप लोकप्रियता मिळाली. सोबत जितेंद्रच्या अभिनयाचे सुद्धा लोकांनी खूप कौतुक केले.
रघुवीर यादव आणि नीना गुप्ता देखील या सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारत होते. या वेबसिरीजमधल्या भूमिकेसाठी उत्कृष्ट हास्य कलाकार म्हणून जितेंद्रला फ़िल्मफेयर अवॉर्ड देण्यात आले.
जयदीप अहलावत :
अनुष्का शर्मा निर्मित पाताळलोक ही सिरीज यावर्षीच्या सर्वात लोकप्रिय आणि चर्चित सिरीजपैकी एक ठरली. एका सेलिब्रेटी टीव्ही पत्रकाराच्या हत्येच्या कटावर आधारित असलेल्या या सिरीजमध्ये जयदीप अहलावत यांनी पोलीस इन्स्पेक्टर हाथिराम ही भूमिका साकारली होती. जयदीप यांच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना बेस्ट एक्टर इन ड्रामा सीरीज़ केटेगरी मध्ये फ़िल्मफेयर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिषेक बनर्जी :
अभिषेकने पाताळलोक सिरीजमध्ये नकारात्मक भूमिका साकारत सांगलीचे लक्ष वेधून घेतले. त्याने या सिरीजमध्ये निर्दयी अशा हाथोडा नावाच्या आरोपीची भूमिका निभावली होती.
दिव्येंदु :
दिव्येंदु २०२० मध्ये ओटीटी प्लेटफॉर्म्सवर खूप हिट झाला. कारण दिव्येंदुने मिर्ज़ापुर २ मध्ये मुन्ना त्रिपाठी, झी ५ आणि ऑल्ट बालाजीच्या बिच्छू का खेल यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या तिन्ही सिरीज खूप गाजल्या.
पंकज त्रिपाठी :
सध्या पंकज त्रिपाठी फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांची जागा पक्की केली आहे. मिर्झापूर २ मधला कालीन भैया साकारत त्यांनी खूप कौतुक मिळवले. सोबत ते पंकज त्रिपाठी अनुराग बासूच्या ल्युडो चित्रपटातही दिसले. डिज़्नी प्लस हॉटस्टारच्या क्रिमिनल जस्टिस- बिहाइंड क्लोज़्ड डोर्स मध्ये त्यांनी माधव मिश्रा या वकिलाची भूमिका साकारत लोकांना त्यांची दखल घ्यायला भाग पडले.
रसिका दुग्गल :
मिर्ज़ापुर २ मधल्या कालीन भैया च्या पत्नीच्या भूमिकेतून तिने लोकांना आणि समीक्षकांना प्रभावित केले. शिवाय नेटफ्लिक्सवरच्या मीना नायर यांच्या अ सूटेबल बॉय मधील भूमिकेसाठी सुद्धा ती चर्चेत होती.
बरुण सोबती :
टेलिव्हिजन स्टार बरुण सोबतीने या वर्षी सुद्धा त्यांच्या अभिनयाने लोकांना प्रभावित केले आहे. वूट सिलेक्टच्या असुर आणि इरोस नाऊच्या हलाहल मध्ये वरुणने त्यांच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली.
तृप्ती डिमरी :
अनुष्का शर्मा निर्मित नेटफ्लिक्सच्या बुलबुल मध्ये तृप्ति डिमरीने मुख्य भूमिका साकारली आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटात तुप्तीच्या अभिनयाला लोकांनी खूप दाद दिली. तृप्तीला तिच्या अभिनयासाठी बेस्ट एक्टर फीमेल (वेब ओरिजिनल फ़िल्म) केटेगरी मध्ये फ़िल्मफेयर अवॉर्ड दिला गेला.
सुष्मिता सेन :
सुश्मिताने बऱ्याच काळानंतर डिज़्नी प्लस हॉटस्टारच्या आर्या मधून अभिनयात पुनरागमन केले आहे. ह्या सिरीजमधून तिने ओटीटीवर यशस्वी पदार्पण केले. सुष्मिताला तिच्या या भूमिकेसाठी बेस्टर एक्टर इन ड्रामा सीरीज़ फीमेल केटेगरी मध्ये फ़िल्मफेयर पुरस्कार दिला गेला.