Sunday, January 26, 2025
Home वेबसिरीज वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वेबसीरिज ‘आर्या’ चांगलीच गाजली होती. यानंतर आता या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता या भागामध्ये देखील अभिनेत्री तिचा जबरदस्त अंदाज दाखवणार आहे. याची झलक ट्रेलरमधून मिळत आहे. हा ट्रेलर बघितल्यानंतर आता प्रेक्षक या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच आता प्रेक्षक असे म्हणत आहेत की, वाघीण परत आली आहे ही वेबसीरिज १० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

‘आर्या २’ चा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. मागील सिझनपेक्षा धमाकेदार अंदाजात सुष्मिता या सिझनमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या वेबसीरिजचा ट्रेलर शेअर करून सगळ्यांचे आभार मानले आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुमच्या धैर्यासाठी धन्यवाद. तुमच्यासमोर आर्या घेऊन येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या सिझनमध्ये तिचा विकनेस तिची सगळ्यात मोठी ताकद ठरणार आहे. वाघीण येत आहे. सगळे एपिसोड १० डिसेंबरला दाखवले जाणार आहेत.” (Web series sushmita sen aarya season 2 official trailer released )

‘आर्या २’ चा ट्रेलर पाहून सगळे चाहते खूप प्रेम दर्शवत आहेत. एक चाहता म्हणत आहे की, माझी वाघीण परत आली आहे. ‘आर्या’ ही वेबसीरिज या वर्षी इंटरनॅशनल एम्मी अवॉर्डमध्ये बेस्ट ड्रामा कॅटेगरीमध्ये नॉमिनेट झाली होती. या वेबसीरिजमधून सुष्मिता सेनने ओटीटीवर पदार्पण केले होते. तसेच राम माधवानी यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या मधील सुष्मिता सेनच्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावले होते. त्यामुळे या सीरिजच्या पुढच्या भागाची सगळ्यांना खूप उत्सुकता लागली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

काय सांगता! चक्क आमिर खानने मागितली केजीफ स्टार यशची माफी

मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर मुलगा अरहानची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

अरे वा! ‘मोनिशा’ आणि ‘अनुपमा’ची झाली भेट, या भेटीचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा