Tuesday, January 31, 2023

‘पंचायत 2’ ते ‘दिल्ली क्राईम 2’, 2022मध्ये गाजलेल्या 5 वेबसीरिज, एक नजर टाकाच

सण 2022 वर्षाचे फिल्मफेअर OTT पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहे. अशा अनेक मालिकांचा या अवॉर्ड शोमध्ये समावेश आहेत, ज्या प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करताना दिसल्या. ‘पंचायत 2’, ‘टबर’, ‘रॉकेट बॉईज’ या सारख्या सीरीज आणि त्यातील कलाकारांना पुरस्कार सोहळ्यात स्थान मिळवता आले. म्हणूनच आम्ही तुम्हाला त्या मालिकांबद्दल सांगत आहोत, ज्या प्रेक्षकांच्या नजरेत पुरस्कार विजेत्या आहेत.

अलीकडेच फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात ‘पंचायत सीझन 2’, ‘रॉकेट बॉईज’, ‘गुलक सीझन 3’ आणि ‘टब्बर’ यांसारख्या वेब सीरिजना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. यामध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव, पवन मल्होत्रा, जिम सरभ आणि जमील खान या कलाकारांना पुरस्कार मिळाले. पण प्रेक्षकांना केवळ या सीरिजच नाहीत, तर अशा अनेक सीरिज आवडल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या सीरिजसाठी अभिनेते-अभिनेत्रींचेही कौतुक करण्यात आले. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही सीरिजबद्दल सांगत आहोत.

‘दिल्ली क्राइम सीझन 2’
शेफाली शाह, आदिल हुसेन, रसिका दुग्गल, राजेश तैलंग या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असलेल्या ‘दिल्ली क्राइम सीझन 2’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सीझनमध्ये वास्तविक घटनांवर आधारित काल्पनिक कथा होती. यामध्ये शेफालीच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले.

‘डॉ. अरोरा’
‘डॉ. अरोरा’मध्ये कुमुद मिश्रा डॉ. विशेष अरोरा यांच्या भूमिकेत दिसले, जे एक गुप्त रोग विशेषज्ञ आहे. निधी सेठिया आणि इम्तियाज अली यांनीही सीरिज तयार केली आहे. त्याची ही स्टाेरी हृदयाला भिडणारी होती. ही सीरिज तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.

‘घर वापसी’
‘घर वापसी’ ही एक फॅमिली कॉमेडी सीरीज आहे. या सीरिजमध्ये अनुष्का कौशिक, विशाल वशिष्ठ आणि आकांक्षा ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. घरापासून दूर राहणाऱ्या मुलाचे घरगुती जीवन आणि कुटुंबातील बदलती परिस्थिती या   सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. डिस्ने प्लस हॉट स्टारवर ही मालिका तुम्ही पाहू शकता.

‘गिल्टी माइंड सीझन 2’
श्रिया पिळगावकर, वरुण मित्रा आणि नम्रता सेठ यांचा समावेश असलेल्या ‘गिल्टी माइंड सीझन 2’ देखील प्रेक्षकांमध्ये खूप गाजली. सीरिजमध्ये विविध सामाजिक मुद्दे मांडताना दिसत आहे. ही वेब सीरिज तुम्ही OTT प्लॅटफॉर्म ऍमेझाॅन प्राईमवर पाहू शकता.

‘महाराणी 2’
‘महाराणी 2’मध्ये हुमा कुरेशी आणि सोहम शाह यांची व्यक्तिरेखा उत्कृष्ट आहे. बिहारच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या सीरिजचे समीक्षकांनीही कौतुक केले. ही सीरिज तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता. (web series year ender 2022 panchayat 2 nirmal pathak ki ghar wapasi ott filmfare awards list)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हा कसला फायर, हा तर फ्लॉवर! शहनाझने मांडीवरून गाऊन सरकवताच लाजून लाल झाला गुरु रंधावा

बोल्ड अँड ब्यूटीफुल! दुबईच्या रस्त्यांवर मौनीचा हटके अंदाज, पाहा फोटो

हे देखील वाचा