Monday, July 1, 2024

लाखो चाहत्यांना प्रेमात पाडणारी मौनी रॉय, पहिल्याच भेटीत सुरज नांबियरवर झाली होती फिदा

छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यतचा प्रवास करत मौनी रॉयने आपल्या दमदार अभिनयाने वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नागिन मालिकेतून शिवांगी नावाने घराघरात ओळख मिळवणारी मौनी आज भॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमधील आगाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक चाहते तिच्या सुंदरतेव मरतात मात्र, लाखो लोकांना प्रेमात पाडणारी पती सुरज नांबियाच्या प्रेमात पडली आणि यांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आजच्या दिवशीच म्हणेजच (दि, 27 जानेवारी) रोजी या जोडप्याने गोवामध्ये डेस्टीनेशन वेडिंग केली होती. तर या खास दिवशी या जोडप्याच्या लव्ह स्टोरीबद्दल माहिती जाणून घेऊयात

लोकप्रिय अभिनेत्री मैनी रॉय (Mouni Roy) आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. लग्न झाल्यापासून अभिनेत्रीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सतत पती सुरज नांबियार (Suraj Nambiyar) सोबतचे नवनवीन फोटो शेअर करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आजच्या दिवशीच हे जोडपं विवाह बंधनात अडकलं होतं या जोडप्याच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. नागिन बनून घरघरात पोहोचलेली मौनी सुरजच्य प्रेमात कशी पडली हे फार कमी लोकांना माहित आहे. चित्रपटांसारखीच यांची प्रेमकाहानी आहे.

2019 साली दुबईमध्ये मौनी आणि सुरज नांबियार यांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीतच मौनीचं मन सुरजवर आलं होतं. मग हळुहळु यांची मैत्री झाली आणि सुरजलाही मैनी आवडू लागली. यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कसं झालं  हे या दोघांना देखिल समजलं नाही. त्यांना ही गोष्ट सजल्यावर दोघांनी एकमेकांना डेट कारला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

मौनी आणि सुरजला अनेकदा पॅपराझींनी एकत्र स्पॉट केले होते मात्र, अभिनेत्रीने कधी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मीडियासमोर कबूल केलं नाही. यानंतर 2021 साली अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जगासमोर आपल्या नात्याची कबूली दिली आणि यानंतर या दोघांच्या फोटोंनी सोशल मीडियावर कहरच केला होता. अनेक दिवस डेट केल्यानंतर या जोप्याने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

मौनी रॉय आणि सुरज नांबियर यांनी (दि, 27 जानेवारी 2022) साली गोवामध्ये थाटामाटात डेस्टीनेशन वेडिंग केली. या जोडीने गोवाच्या समुद्र किनाऱ्यावर हटके पद्धतीने सप्तपदी घेतली होती. या लग्न सोहळ्यामध्ये जावळचे नातेवाइक आणि मित्रपरिवारांना आमंत्रित केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाळीसहून अधिक सिनेमात काम करूनही ‘आश्रम 3’मध्ये इंटीमेट सीन देताना घाबरला होता बॉबी देओल, पण का?
चॉकलेट गर्ल! सुरभी चंदनच्या साडी लूकने चाहत्यांना घातली भुरळ…

 

हे देखील वाचा