Wednesday, February 11, 2026
Home बॉलीवूड इंडस्ट्रीत सगळेजण एकमेकांवर जळतात; फराह खानने व्यक्त केली खंत…

इंडस्ट्रीत सगळेजण एकमेकांवर जळतात; फराह खानने व्यक्त केली खंत…

फराह खान एक कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि कंटेंट क्रिएटर देखील आहे. ती यूट्यूबवर एक कुकिंग चॅनल चालवते, सेलिब्रिटींच्या घरी भेट देते आणि त्यांच्याशी बोलते. अलीकडेच फराह जॅकी भगनानी आणि रकुल प्रीतला भेटली. या दरम्यान फराहने तिच्या एका फ्लॉप चित्रपटाचा उल्लेख केला, ज्याच्या अपयशामुळे बॉलिवूडमधील अनेक लोक आनंदी झाले. तो चित्रपट कोणता होता? आणि फराहने बॉलिवूडमधील लोकांबद्दल कोणते खुलासे केले?

फराह खान तिच्या कुकिंग यूट्यूब चॅनलसाठी जॅकी भगनानी आणि रकुल प्रीतच्या घरी पोहोचली. स्वयंपाकाव्यतिरिक्त त्यांनी करिअर आणि चित्रपटांबद्दलही चर्चा केली. या संभाषणात जॅकीने सांगितले की जेव्हा त्याचा निर्मित चित्रपट ‘बेलबॉटम’ फ्लॉप झाला तेव्हा लोकांनी खूप वाईट कमेंट केल्या. यावर फराह खानला आठवले की तिच्यासोबतही असेच घडले होते.

फराह खान सांगते की २०१० मध्ये ‘तीस मार खान’ चित्रपटाच्या अपयशावर बॉलिवूडमधील अनेक लोक आनंदी होते. ती म्हणते, ‘आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोक स्वतःच्या यशापेक्षा इतरांच्या अपयशावर जास्त आनंदी असतात.’ मला आठवतंय जेव्हा ‘तीस मार खान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही, तेव्हा बॉलिवूडमध्ये उत्सवाचे वातावरण होते. मी ज्या लोकांसोबत काम केले आहे त्यांचा दृष्टिकोन ‘अभी आयी ना लाईन पर’ असा होता. पण माझा हा चित्रपट जनरेशन झेडला आवडतो.’

या व्हीलॉगमध्ये फराह खान जॅकी भगनानीला सांगते, ‘जॅकी, आम्हालाही निर्माता व्हायचे आहे.’ यावर जॅकी उत्तर देतो, ‘निर्माता बनू नकोस.’ फराह हसायला लागते आणि म्हणते, ‘हो, निर्माता बनू नकोस, कारण आधी त्याचे (जॅकी) दहा मजले होते आणि निर्माता झाल्यानंतर फक्त पाचच उरले आहेत.’

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

दमदार कंटेंटने भरला आहे येता आठवडा; या वेब सिरीज आणि मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

हे देखील वाचा