महाराष्ट्राची 400 वर्षांची परंपरा असलेली बैलगाडा शर्यत ही केवळ एक शर्यत नसून, ती एक सांस्कृतिक परंपरा आहे. या शर्यतीत शेतकरी आणि बैलाचं नातं देखील दिसून येतं. या नात्याचं सुंदर चित्रीकरणं ‘आला बैलगाडा’ या गाण्यात करण्यात आले आहे. हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यात शेतकरी आणि बैलाचं नातं अतिशय भावनिक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. शेतकरी आणि बैल एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. शेतकरी बैलाची चांगली काळजी घेतो आणि बैल शेतकऱ्यासाठी वचनबद्ध असतो. या गाण्यातील बोल आणि संगीत हे या नात्याची परिपूर्ण व्याख्या करतात.
‘आला बैलगाडा’ (ala bailgada) गाण हे बैलगाडा शर्यतीची शानदार परंपरा सांगणारं एक उत्तम गाण आहे. हे गाण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मराठी मनोरंजन विश्वात विविध विषयांवरची नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच बैलगाडा शर्यत हे नवीन गाणं लोकांच्या भेटीला आलंय. आदर्श शिंदेंच्या (Adarsh Shinde Songs)आवाजातलं हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरलंय. आता या गाण्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही कौतुक केलंय.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “‘आला बैलगाडा’ हे गाणं खूपच सुंदर आहे. गाण्याचे बोल आणि संगीत उत्तम आहेत. गाण्यातील कलाकारांनीही उत्तम अभिनय केला आहे. गाण्याचे निर्माते ऋतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी गाणं केल्याबद्दल त्यांचे खूप कौतुक. यापुढील गाणी वेगवेगळ्या प्रकारची नव्या पिढीला भावतील आवडतील अशी करावी. या गाण्याच्या निर्मिती केलेल्या बिग हीट मीडियाच्या सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्या.”
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक pic.twitter.com/moZFmRZwgu
— devendra jadhav (@devendr50306300) December 17, 2023
सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि ट्रेंडिंग गायिका सोनाली सोनावणे यांनी ‘आला बैलगाडा’ हे गाणं गायल आहे. तर प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. (What did Ajit Pawar say about Adarsh Shinde song Aala Bailgada)
आधिक वाचा-
–लक्ष्मी आली! रुबिना दिलैकने दिला जुळ्या मुलींना जन्म? सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल
–‘Sam Bahadur’ची 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू; जाणून घ्या 16व्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन