Monday, March 4, 2024

कडाक्याच्या थंडीत रणवीरनंतर आता ‘या’ अभिनेत्याने केले न्यूड फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाला…

अलीकडच्या काळात फोटोशूट हा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील म्हणत्वाचा भाग बनला आहे. अनेक कलाकार नविन फोटोशूट करतात आणि आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अपलोड करत असतात. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणवीर कपूरने देखील न्यूड फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याच्या या फोटोंनी सोशल मीडियावर तूफाण राडा झाला होता. अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या अभिनयासाठी आणि स्टंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. यावेळी विद्युतने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून लोकांना रणवीर सिंगची आठवण झाली आहे.

रणवीर सिंगने 2022मध्ये न्यूड फोटोशूट केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता. अलीकडेच रणबीर कपूर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या एका दृश्यात कपड्यांशिवाय दिसत आहे. आता विद्युत जामवालनेही असेच काहीसे केले आहे. रविवारी सकाळी अभिनेता विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) त्याच्या इंस्टाग्रामवर काही न्यूड फोटो शेअर केलो आहेत. ज्याची खूप चर्चा झाली आहे.

विद्युत जामवाल सध्या हिमालयात आहेत. त्याने तीन फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “हिमालय पर्वतरांगांमध्ये माझे परतणे “देवाचे निवासस्थान” 14 वर्षांपूर्वी सुरू झाले. मला हे समजण्याआधी, दरवर्षी 7-10 दिवस एकटे घालवणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. जंगलात येताना, मला माझा एकटेपणा शोधायला आवडते आणि “मी कोण नाही” हे जाणून घेण्याचे महत्त्व समजते, जे “मी कोण आहे” हे जाणून घेण्याची पहिली पायरी आहे तसेच शांततेत स्वतःचे रक्षण करतो.

मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात आरामदायक आहे. मी निसर्गाच्या नैसर्गिक वारंवारतेशी सुसंगत आहे आणि मी स्वत: ला सॅटेलाइट डिश अँटेना म्हणून कल्पना करतो. इथेच मी स्वतःला घेरून घरी येऊ इच्छित असलेली ऊर्जा निर्माण करतो. माझ्या जीवनातील एक नवीन अध्याय अनुभवण्यासाठी तयार आहे – पुनर्जन्म.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

या पोस्टसोबतच अभिनेत्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणाही केली आहे. त्यांनी पुढे लिहिले की, आता मी माझ्या पुढील अध्यायासाठी तयार आणि उत्साहित आहे. क्रॅक, जो 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (After Ranveer in the bitter cold now actor Vidyut Jammwal has done a nude photoshoot)

आधिक वाचा-
आदर्श शिंदेच्या ‘आला बैलगाडा’ने होणार जल्लोष; मराठी संगीतविश्वात ‘बीग हिट मीडिया’चं दणक्यात पदार्पण
हिना खानचा लूक पुन्हा एकदा चर्चेत; पाहा लेटेस्ट फोटोशूट

हे देखील वाचा