‘आई कुठे काय करते?’ ही मालिका मराठी मनोरंजन विश्वातील लोरप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतील पात्रांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातील अरूंधतीच्या पात्राने घराघरात आपले एक वेगळे स्थान निर्माण केल आहे. हे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारले आहे.
मधुराणीनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या खाजगी आयुष्याबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून माहिती देताना दिसते. मधुराणीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तिने विषेश म्हणजे अभिनयाच्या जोरावर महिलांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मधुराणीने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
मधुराणी (Madhurani Prabhulkar ) आत्तापर्यंत मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांत काम करताना दिसली. पण, आता ती ओटीटी माध्यमात झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर अभिनेत्रीने स्वत: खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलताना मधुराणीने ओटीटीवरील सेक्स व हिंसा या विषयांवरच्या सध्याच्या वेब सीरिजबद्दल परखड मत मांडलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म ज्या पद्धतीने वाढतोय, त्याबाबत तुझं म्हणणं काय आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री मधुराणी म्हणाली की, “हो, मी एक-दोन स्क्रिप्टवर काम करत आहे. पण त्यातले पात्र वेब सीरिजप्रमाणे आहे का, या बद्दल मला काहीही माहिती नाही. मात्र, काही संकल्पना माझ्या मनात आहेत; ज्या सध्या मी फक्त कागदावर उतरवण्याच काम करत आहे. ओटीटीमध्ये टीआरपीची फारशी बंधने नाहीत. मात्र त्याच्यातही सारखेपणा आहे. सेक्स व हिंसा या विषयांशिवाय तिकडे काही चालत नाही. जे सध्या सुरू आहे हे बदल पाहिजे.”
तसेच, “सेक्स व हिंसा या विषयांवर असलेल्या सीरिज पाहूण मला प्रचंड त्रास होतो. माझ्यासाठी डोकं ठिकाणावर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मी जेव्हा सीरिज बघते तेव्हा त्या जागी आपल्याला ठेवुन विचार करते. मला चागंल्या गोष्टी बघायला आवडतात. त्यामुळे मी तसा विषय शोधत असते. पण, असा विषय ओटीटीवर मिळणं फार कठीण आहे,” असे मधुराणी सांगितले. (What exactly did Madhurani Prabhulkar say about the web series on sex and violence on OTT)
अधिक वाचा-
–विसाव्या वर्षी साकारला ८० वर्षांचा म्हातारा, दिलीप साहेबांवरील प्रेमाखातर मनोज यांनी बदलले स्वत:चे नाव
–मिताली मयेकरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सिद्धार्थ चांदेकर कमेंट करत म्हणाला, ‘लगीन करायचंय…’