Wednesday, July 3, 2024

बॉलिवूड अन् हॉलिवूड यापैकी काय निवडेल प्रियांका चोप्रा?; ‘हे’ उत्तर देत अभिनेत्रीने सर्वांनाच केलं चकित

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि अदाकारीसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बॉलिवूडसोबतच प्रियांका हॉलिवूडमध्येही काम करत आहे. ती सध्या आगामी ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने शूटिंगच्या सेटवरून अनेक फोटो शेअर केले आहेत. अलिकडेच जेव्हा तिला विचारण्यात आले की, ती बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्हीपैकी कुठे काम करणे पसंत करते. तेव्हा तिने या प्रश्नाचं एक मजेशीर उत्तर दिलं आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने अनेक कठिण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

अनेक आव्हानात्मक प्रश्न विचारले गेले
व्हिडिओमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपसह ब्लू डेनिम शॉर्ट्स परिधान केले आहे. तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. यादरम्यान, तिला दोन पर्याय दिले जात आहेत. एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. डान्स करताना प्रियांका तिच्या उत्तरानुसार स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला वळते आणि तिच्या प्रश्नाचे उत्तर देते.

प्रियांकाने दिले मजेशीर उत्तर
प्रियांकाने सांगितले की, तिला नियमित ट्रिम करायला आवडते. ती क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये नेहमी क्वालिटीची निवड करते. त्याचप्रमाणे शेवटी तिला बॉलिवूड आणि हॉलीवूड यापैकी एक निवडावे लागत आहे. त्यानंतर प्रियांका तिच्या उत्तरात म्हणते की, मी हा प्रश्न सोडते ( I quite). व्हिडिओ पोस्ट करताना प्रियांकाने लिहिले की, “काही प्रश्नांची उत्तरं न देता सोडून देणं चांगले असते.”

प्रियांकाचे आगामी चित्रपट
प्रियांका चोप्राचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘द व्हाइट टायगर’ हा होता. त्याच वेळी, २०२० मध्ये ती हॉलिवूड चित्रपट ‘वी कॅन बी हीरोज’ मध्ये दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘सिटाडेल’, तसेच ‘जी ले जरा’ आणि ‘मॅट्रिक्स ४’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा