Monday, July 1, 2024

जेव्हा बॉलिवूडचे ‘खलनायक’ म्हणाले होते, ‘महिलांच्या छोट्या कपड्यांनी माझे करिअर संपवले’

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते होऊन गेले, ज्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकांमध्ये जिंवतपणा आणला. मग ते पात्र, नायकाचे असो किंवा खलनायकाचे. असेच एक अभिनेते आहेत, ज्यांनी ७० आणि ८०च्या दशकातील मुलींच्या चेहऱ्यांचा रंगच उडवला होता. कारण, त्यांची प्रतिमा इतकी खराब होती की, एकदा महिला डॉक्टरने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांची प्रतिमा जरी सिनेमात वाईट भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीची बनली असली, तरी ते सहअभिनेत्रीला कधीही कोणता त्रास होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायचे.

अभिनेते रंजीत (Actor Ranjit) यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ७०च्या दशकात बॉलिवूडमध्ये त्यांची प्रतिमा ‘रेपिस्ट’ची बनली होती. तसेच, त्यांनी आपली कारकीर्द संपण्यामागील कारणही सांगितले.

हे देखील वाचा