Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड मुलगा तैमूरच्या आठवणीत डान्स रियॅलिटी शोच्या मंचावरच रडली होती ‘बेबो’ करीना कपूर खान, पाहा भावुक व्हिडिओ

मुलगा तैमूरच्या आठवणीत डान्स रियॅलिटी शोच्या मंचावरच रडली होती ‘बेबो’ करीना कपूर खान, पाहा भावुक व्हिडिओ

बॉलिवूडची ‘बेबो’ करीना कपूर खान अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या हजरजबाबीपणासाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बेबोला स्वत: तयार केलेल्या नियमांवर आयुष्य जगायला फार आवडते. यासह ती सर्वोत्तम आई आणि एक उत्तम पत्नीचे उदाहरणदेखील सादर करताना दिसत असते. अलीकडेच ती दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिचे आपल्या दोनी मुलांवर खूप प्रेम आहे. सध्या एक भावुक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा मोठा मुलगा तैमूर अली खानची करीनाला खूप आठवण येते आणि ती चक्क रडू लागते.

करीना कपूर खानचा हा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ ‘डान्स इंडिया डान्स ७’ डान्स रियॅलिटी शोमधील आहे, ज्यामध्ये ती एक अभिनय पाहून खूप भावुक झाली आहे. यावेळी अभिनेत्रीने आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही ती आपल्या अश्रूंना रोखू शकली नाही. व्हिडिओमध्ये ती आपला मुलगा तैमूर अली खानची, आठवण येऊन भावुक झाली होती.

व्हिडिओमध्ये करीना असे सांगत आहे की, ‘मी समजू शकते की, आई होणे काय आहे ते. मला आत्ता माझा मुलगा तैमूरची खूप आठवण येते आहे, जो आत्ता लंडनमध्ये आहे.’ हा व्हिडिओ खूप जुना आहे. पण हे पाहून हे स्पष्ट झाले की, इतर आईप्रमाणेच करीनासुद्धा आपल्या मुलांवर खूप प्रेम करते.

करीना नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. करीना तिच्या गरोदरपणातही कामात खूप सक्रिय होती. लॉकडाऊन असल्यामुळे ती आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. अलीकडेच तिने तिच्या दोन्ही लाडक्या मुलांसोबत, मातृदिनानिमित्ताने एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये मोठा भाऊ तैमूर आपल्या लहान भावाला घेऊन मांडीवर दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा शर्माच्या ‘या’ गाण्याने यूट्यूबवर केला १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार, व्हिडिओ शेअर करत दिला चाहत्यांना धन्यवाद

-‘चांद ये हर रोज मैं देखू..! राहुल वैद्य आणि अनुष्का सेनने सोबत गायलं रोमँटिक गाणं, पाहा व्हिडिओ

-अरबाज खानने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सनी लागली ढसा ढसा रडू, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

हे देखील वाचा