Wednesday, February 19, 2025
Home बॉलीवूड नेहा शर्माच्या ‘या’ गाण्याने यूट्यूबवर केला १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार, व्हिडिओ शेअर करत दिला चाहत्यांना धन्यवाद

नेहा शर्माच्या ‘या’ गाण्याने यूट्यूबवर केला १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार, व्हिडिओ शेअर करत दिला चाहत्यांना धन्यवाद

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या ‘थोडा थोडा प्यार’ या गाण्याला यूट्यूबवर खूप पसंत केले जात आहे. तसेच या गाण्याच्या छोट्या क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, जे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडल्या आहेत. या गाण्याने यूट्यूबवर १०० दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.

अभिनेत्री नेहा शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओतून तिने चाहत्यांना माहिती दिली आहे की, तिच्या गाण्याने यूट्यूबवर १०० दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पूर्ण केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन तिने आनंद व्यक्त केला आहे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे. व्हिडिओमध्ये ती आयशासोबत डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओ इस्टांग्रामवर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. ‘थोडा थोडा प्यार’ या गाण्याने यूट्यूबवर १०० दशलक्ष व्ह्यूज पूर्ण केले आहेत. रीटा शुक्ला, तुला आपल्या टॉप नॉटबद्दल माहित आहे का?” अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त पसंत केला जात आहे. व्हिडिओला साडेतीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हे रोमँटिक गाणे, झी म्युझिक कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाले होते. सिद्धार्थ मल्होत्रा आणि नेहा शर्मावर चित्रीत केलेले हे गाणे गायक स्टेबिन बेन याने त्याच्या जबरदस्त आवाजात गायले आहे. या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. या गाण्याला संगीत निलेश आहुजा यांनी दिले आहे.

नुकताच तिने तिच्या आगामी ‘जोगीरा सारा रा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टचवूड मल्टीमीडिया क्रिएशन्सचे नईम ए सिद्दीकी करत आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चांद ये हर रोज मैं देखू..! राहुल वैद्य आणि अनुष्का सेनने सोबत गायलं रोमँटिक गाणं, पाहा व्हिडिओ

-अरबाज खानने विचारला ‘तो’ प्रश्न अन् सनी लागली ढसा ढसा रडू, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

हे देखील वाचा