Monday, July 1, 2024

भयानक! मृत्यूवेळी अभिनेत्रीच्या अंगावर पसरले होते किडे; ‘या’ आजारामुळे झाली होती अशी दयनीय हालत

आपल्या अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शनिवारी (१८ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करायची. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ८० च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असलेल्या निशा नूरचा जन्म चेन्नईमध्ये १८ सप्टेंबर १९६२ रोजी झाला. तिचे शिक्षण देखील चेन्नईमध्येच पूर्ण झाले. त्यानंतर आपली अभिनयातील आवड लक्षात घेता, तिने कलाविश्वात काम शोधण्यास सुरुवात केली. साल १९८० मध्ये तामिळ चित्रपट ‘मंगला नायगी’ तिने प्रथम एक सहायक अभिनेत्रीची भूमिका पार पडली. या चित्रपटातील तिचा अभिनय पाहून सुपरस्टार रजनीकांत यांच्यापासून ते अभिनेता कमल हासन यांच्या पर्यंत अनेक दिग्गज कलाकार निशा बरोबर काम करण्यास तयार होते. परंतु तिचा चित्रपटांमधील प्रवास फार काळ टिकला नाही.

निशाने यानंतर अनेक तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. तिने आपल्या कारकिर्दीमध्ये ‘इलामाई कोलम’, ‘एनाक्कागा काथिरू’, ‘टिक टिक टिक’, ‘मनामदुराई मल्ली’, ‘इनिमाई इधो इधो’, ‘अवल सुमंगलीथन’, ‘कल्याण अगाथीगल’, ‘अवल ओरू वसंतम’ तसेच ‘चुवाप्पू नाडा’, ‘मिमिक्स परेड’, ‘अय्यर द ग्रेट’ या चित्रपटांमध्ये काम केले. साल १९९५ मध्ये तिचा शेवटचा ‘मिमिक्स ऍक्शन ५००’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (When actress Nisha Noor was found dying on the streets due to aids related complications)

अभिनयात तिने लवकरच यशाचे शिखर गाठले होते. एका रात्रीत स्टार झालेल्या या अभिनेत्रीची रोषणाई लवकरच फिकी पडली. खूप कमी कालावधीमध्ये मिळालेली तिची प्रसिद्धी फार काळ टिकली नाही. तिला चित्रपट मिळणे काही काळानंतर बंद झाले. त्यानंतर तिच्या आयुष्यातील वाईट काळ सुरू झाला. अतिशय विचित्र पद्धतीने ती मृत्यूच्या दारात पोहचली. कुणालाही वाटले नव्हते की एवढ्या भयंकर पद्धतीने तिचा मृत्यू होईल.

दर्गाबाहेर पडली होती निशा, अंगावर चढले होते किडे आणि मुंग्या
खूप कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळवलेल्या निशाला नंतर चित्रपट मिळणे बंद झाल्यामुळे तिच्याकडे पैशांची अडचण निर्माण होऊ लागली. त्यानंतर ती चित्रपटांमधून गायबच झाली. अनेकांनी ती वेश्या व्यवसाय करत होती, असेही म्हटले होते. तसेच या दरम्यान तिला अनेक आजारांनी ग्रासले होते. काही काळानंतर एका दर्गा बाहेर ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यावेळी तिच्या अंगावर किडे आणि मुंग्या चढल्या होत्या. अनेकांनी असेही म्हटले की, ती भीक मागून पोट भारत होती. लोकांनी तिला दवाखान्यात दाखल केले. त्यावेळी अनेकांना ही अभिनेत्री निशा आहे यावर विश्वासही बसत नव्हता. दवाखान्यात दाखल केल्यांनतर तिला एड्स असल्याचे समोर आले.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेवटच्या क्षणी तिची हालत कशी झाली होती. तिच्या शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा उरला होता. शरीर पूर्णतः जीर्ण झाले होते. तिच्या देहावर पुरेसे कपडे देखील नव्हते. अखेर २३ एप्रिल २००७ रोजी तिने या जगाचा निरोप घेतला. आज ती हयात असती, तर तिचा ५९वा वाढदिवस साजरा करताना दिसली असती. अभिनय क्षेत्रामध्ये तिचे खूप शोषण झाले असावे, असे अंदाज तिच्या मृत्यूनंतर अनेकांनी बांधले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा