Saturday, July 6, 2024

बघायला गेला आवडत्या अभिनेत्याला, पण पिवळ्या साडीतील रवीनाच बसली मनात; मग सेटवरून झाली हाकालपट्टी

बॉलिवूड कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते तरसतात. मात्र, बॉलिवूडचा एक असा ‘पॉवरहाऊस’ अभिनेता आहे, जो एकेकाळी नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिला पाहून हैराण झाला होता. कारण, त्याने तिच्याइतकी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती. असे खुद्द रणवीर कपूर याने सांगितले होते. मात्र, रणवीरने त्यावेळी असं काहीतरी केलं होतं, ज्यामुळे रवीनाने त्याला थेट सेटवरून बाहेर हाककले होते. १९८५ साली मुंबईत जन्मलेला रणवीर बुधवारी (दि. ०६ जुलै) आपला ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आपण रणवीर आणि रवीनाचा हा किस्सा जाणून घेऊया.

तर झाले असे होते की, रवीना टंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) त्यांच्या १९९४ सालच्या ‘मोहरा’ (Mohra) या सिनेमाची शूटिंग करत होते. त्यावेळी रणवीर सिंग (Ranveer Singh) जेमतेम ९ किंवा १० वर्षांचा होता. रणवीरची भावंडं कॅनडावरून आली होती आणि त्यांना सुपरस्टार अक्षय कुमार याला भेटायचे होते. अशात रणवीरच्या वडिलांनी काही निर्मात्यांशी चर्चा केली आणि त्यांना अक्षयच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याच्या शूटिंगबद्दल समजले होते. अशामध्ये रणवीर आणि त्याचे कुटुंबीय अक्षयला भेटण्यासाठी सेटवर पोहोचले. मात्र, तिथे पोहोचल्यांतर रणवीरने असे काही केले की, त्याला सेटवरून बाहेर काढण्यात आले होते.

रणवीर सिंग याने हा किस्सा एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. त्याने सांगितले होते की, जेव्हा तो सेटवर पोहोचला, तेव्हा रवीना टंडन पिवळ्या रंगाच्या साडीत आणि भिजलेल्या केसांमध्ये ‘टिप टिप बरसा पानी’ची शूटिंग करत होती. तो म्हणाला, “मी माझ्या आयुष्यात इतकी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती. मी तिला एकटक बघत होतो. मी असे केल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती आणि तिने मला सेटवरून बाहेर काढले होते.”

यानंतर रणवीरला खूपच वाईट वाटले होते आणि तो सेटवरून बाहेर आला होता. त्यावेळी त्याचा मूड ठीक करण्यासाठी अक्षयने पुढाकार घेतला होता. खरं तर, रणवीरला जेव्हा सेटवरून बाहेर काढण्यात आले, तेव्हा अक्षयला समजले होते की, त्याला वाईट वाटले असेल. अशात तो खुद्द रणवीरला भेटला आणि त्याच्या हेअरस्टाईलचीही प्रशंसा केली. आपली प्रशंसा ऐकून रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यादरम्यान त्याने अक्षयसोबत फोटो काढला आणि तो फोटो अभिनेता बनल्यानंतर पुन्हा शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

एका मुलाखतीदरम्यान रणवीरला सेटवरून बाहेर काढण्याबाबत खुद्द रवीनानेही सांगितले होते की, ती जेव्हा ‘टिप टिप बरसा पानी’ची शूटिंग करत होती, तेव्हा रणवीर लहान मुलगा होता. तो खूप चांगला होता. मात्र, डोळे वटारून मला पाहत होता. त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते. तसेच, गाण्यात असे काही सीन होते, जे लहान मुलांनी पाहायला नको, असे मला वाटले. त्यामुळे मी त्याला सेटवरून बाहेर काढले होते.”

रवीना टंडन सांगते की, रणवीर नेहमी तिच्याशी याविषयी बोलतो, आणि तिला टोमणेही मारतो. आज रणवीर इतका प्रसिद्ध अभिनेता बनला आहे की, त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. त्याने १५ हून अधिक सिनेमात काम केले आहे. तसेच, तो आगामी बऱ्याच सिनेमांमध्येही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आता तर पाहिलाच पाहिजे! १४६३ कोटीत बनलेल्या मार्व्हलच्या ‘या’ सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंगमधून छप्परफाड कमाई

सुरुवातीला खाल्ला खस्ता, पण मेहनतीच्या जोरावर बनला ‘एनर्जेटिक’ अभिनेता, वर्षाला छापतो ‘इतके’ कोटी

बॉलिवूडमध्ये आपली जादू चालवण्यासाठी सज्ज झालीय समंथा, ‘या’ अभिनेत्याच्या चित्रपटातून करणार पदार्पण!

हे देखील वाचा