अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता अजय देवगण हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. ही ऑनस्क्रीन जोडी नव्वदच्या दशकापासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. दोघांनीही हिंदी सिनेसृष्टीला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. तसेच, तब्बू आणि अजय हे एकमेकांचे जवळचे मित्रही आहेत. ही जोडी आता लवकरच ‘दृश्यम 2’ या सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
अजयमुळेच सिंगल आहे तब्बू
माध्यमांतील वृत्तानुसार, तब्बू (Tabu) हिने एका मुलाखतीत खुलासा केला की, अजय देवगण (Ajay Devgn) हा तिच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. 52 वर्षीय तब्बू म्हणाली की, “तो माझा चुलत भाऊ समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्र होता, जो माझ्या मोठे होण्याचा एक भाग होता. जेव्हा मी लहान होती, समीर आणि अजय माझ्यावर पाळत ठेवायचे. माझ्या मागे-मागे यायचे. इतकंच नाही, तर माझ्याशी बोलणाऱ्या कोणत्याही मुलाला मारण्याची धमकी द्यायचे. ते खूपच गुंडगिरी करायचे. मी आजही सिंगल आहे, तर त्यामागील कारण अजयच आहे.”
View this post on Instagram
तब्बूला आहे अजयवर विश्वास
तब्बूने मजेत असेही म्हटले की, तिने अजयशी आपल्या लग्नासाठी कुणालातरी शोधण्यास सांगितले होते. तब्बू म्हणाली की, “जर कुणी असेल, ज्याच्यावर माझा विश्वास असेल, तर तो अजय आहे. जेव्हा तो जवळपास असतो, तेव्हा सेटवरील वातावरण तणावमुक्त असते. आमच्यात एक खास नाते आहे. तसेच, आम्ही कोणत्याही अटीविना एकमेकांना प्रेम देतो.”
View this post on Instagram
याव्यतिरिक्त आरजे सिद्धार्थ कानन याच्यासोबत चर्चा करताना तब्बू म्हणाली की, अजयने तिला कधीच लग्न करण्यास आणि संसार थाटण्यास सांगणार नाही. ती म्हणाली, “तो मला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. त्याला माहितीये की माझ्यासाठी काय चांगले आहे.”
अजय आणि तब्बूचे सिनेमे
अजयसोबत तब्बूसोबत ‘विजयपथ’, ‘दृश्यम’, ‘हकीकत’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘दे दे प्यार दे’ यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे.
हेही वाचा-
–‘द लेडी किलर’च्या कमाईचा आलेख पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घसरला, कलेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का
–‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये 30 वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य