बॉलिवूडमधील एकदम परफेक्ट कपल म्हणून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याकडे पाहिले जाते. हे दोघं नेहमीच कपल गोल्स देत असतात. दोघांच्या लग्नाला १५ वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असून, अजूनही ते मीडियामध्ये लक्ष केंद्रित करताना दिसतात. एवढ्या वर्षांमध्ये कधीच त्यांच्यामध्ये खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या नाहीत. छोटे मोठे अनेक भांडणं त्यांच्यात होत असतात मुलाखतीदम्यान अनेकदा हे दोघं त्या भांडणांबद्दल बोलत असतात. मात्र एकदा त्यांच्यात जे भांडणं झाले ते दोन दिवस चालले.
View this post on Instagram
झाले असे की, २०१४ साली अभिषेक प्रो-कबड्डी लीगमध्ये यश मिळवल्यानंतर टीमच्या प्रशिक्षणासाठी चेन्नईच्या सत्यभामा यूनिवर्सिटी येथे गेला होता. यावेळी तो युनिव्हर्सिटीचे फाउंडर असणाऱ्या कर्नल जेपिआर यांना भेटला. जेपीआर त्याला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेव्हा त्याने त्या ऑफिसमध्ये पाहिले की, जेपीआर यांना मिळालेले सर्व पुरस्कार त्यांनी खाली जमिनीवर ठेवले आहे. यामागचे कारण त्याने कर्नल यांना विचारल्यावर ते म्हणाले, की ते पुरस्कारांना डोक्यावर चढू देत नाही. हे एकूण तो खूप प्रभावित झाला.
पुढे अभिषेक घरी आला त्याने तेच त्याच्या पुरस्कारांसोबत करायचे ठरवले. अभिषेकने त्याच्या आणि ऐश्वर्याचे सर्व पुरस्कार खाली जमिनीवर ठेवले. ऐश्वर्या रूममध्ये आल्यावर तिने ते पाहिले आणि ती पसारा पाहून खूप संतापली आणि त्याच्याशी अबोला धरला. त्याचे काहीही ऐकून न घेता त्याला रूममधून बाहेर काढले. मात्र तिचा राग शांत झाल्यानंतर अभिषेकने तसे करण्यामागचे कारण तिला सांगितले आणि तिला देखील हा विचार भावला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटनंतर आता मनोरंजनाच्याही मैदानावर उतरतोय धोनी, चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट
कुठे हाेतेय मारामारी तर कुठे तिकिटासाठी 10 हजार देण्याची तयारी, पाहा ‘पठाण’ ने कसा घातलाय धुमाकूळ










