Saturday, April 19, 2025
Home टेलिव्हिजन पती मृत्यूशी झुंज देत असताना जया बच्चन यांनी मागितलेला नवस, बिग बींकडून मोठा खुलासा

पती मृत्यूशी झुंज देत असताना जया बच्चन यांनी मागितलेला नवस, बिग बींकडून मोठा खुलासा

मेगास्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) गेली अनेक दशके बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बिग बी अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती 14’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये बिग बी स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना दिसतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन सांगितलं की, पत्नी जया बच्चन यांचा ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’वर दृढ श्रद्धा असल्याचे त्यांनी उघड केले.

जया यांचा ‘दगडूशेठ हलवाई’ मंदिराशी संबंध
जया बच्चन अनेकवेळा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. असे म्हणतात की, जया जवळपास प्रत्येक खास प्रसंगी पुण्यातील या मंदिराला भेट देतात. एवढेच नाही तर 1983 मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आणि त्यांना अंतर्गत दुखापत झाली. यामुळे बिग बी अनेक महिने रुग्णालयात दाखल होते. हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन मृत्यूशी झुंज देत होते. त्यावेळी जया पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

कौन बनेगा करोडपतीमध्ये पुण्यातील मुजाहिद मोमिन हा हॉट सीटवर बसला होता. त्याचवेळी अमिताभ यांनी एका प्रश्नादरम्यान गणपती पूजेबद्दल बोलताना सांगितले की, त्यांची पत्नी जया बच्चन यांची ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’वर प्रचंड श्रद्धा आहे. यामागचे कारण सांगताना अभिनेते म्हणाले, ‘जयाने जेव्हापासून एफटीआयआय, पुणे येथे शिक्षण घेतले तेव्हापासून तिचा दगडूशेठ हलवाईवरील विश्वास दृढ आहे. तर, शेवटच्या एपिसोडमध्ये मुजाहिद मोमीन 6 लाख 40 हजार प्रश्नावर अडकतो आणि चुकीचे उत्तर देतो. त्यामुळे मुजाहिदला केवळ ३ लाख २० हजार रुपये घरी घेऊन जातो.

कामाबद्दल बोलाचं झालं तर,अमिताभ यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नापेक्षाही तुटलेल्या नात्यामुळे ‘हे’ स्टार्स आले होते चर्चेत, घटस्फोटावरून माजलेला गदारोळ

खुशखबर! तब्बल 13 वर्षानंतर ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीला, ट्रेलरवर कमेंटचा वर्षाव..

हे देखील वाचा