खुशखबर! तब्बल 13 वर्षानंतर ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीला, ट्रेलरवर कमेंटचा वर्षाव..

0
38
avtar movie poster

हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ याने अनेक लोकांना वेड लावून ठेवले होते. या चित्रपटाने अनेक लोकांवर भुरळ घातली होती. 2009 साली हा चित्रपट प्रदर्शित करण्यत आला होता. मात्र, या चित्रपटाची कथा अपूर्ण राहिली होती, त्यामुळे चाहते अनेक दिवसापासून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात होते. आता मात्र, वाट पाहण्याची वेळ गेली, या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

हॉलिवूड चित्रपट प्रेमीसाठी नुकतंच एक आनंदाची बातमी समोर येत आहे., ती म्हणजे 13 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ याचा भाग दोन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पूर्वी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले होते. आता पुन्हा एकदा या चित्रपटाचा दुसरा भाग लोकांची मने जिंकण्यसाठी तयार झाला आहे.

पहिल्या भागामध्ये चित्रपटाचे जे कलाकार होते तेच कलाकार दुसऱ्या भागामध्येही पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळेस चाहत्यांना जास्त धमाल पाहायला मिळणानर आहे. यामध्ये लोकांना पाण्याच्या जगामध्ये घेऊन जाणार आहे. या चित्रपटाचा नुकतंच ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर देखिल आला आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पैडोराच्या जगातील सुंदरतेचे दृष्य दाखवण्यात आले आहे.

चिभपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक दिवसापासून चित्रपटाची वाट पाहणारे चाहते खूपच आनंदी आहेत, ट्रेलरवर कमेंटचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिले की, “13 वर्षापासून चित्रपटाची वाट पाहात आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “या चित्रपटाची अजून वाट नाही पाहू शकत.” अजून एकाने लिहिले की, “ऐवढ्या वार्षानंतर शेवटी…!” असे अनेक चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉन यने केले असून पूर्वीच्या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. पूर्वी या चित्रपटाने जगभरात प्रसिद्धी मिळवली होती आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता तब्बल 13 वर्षानंतर चित्रपटाचा दुसरा भाग नवीन अंदाजामद्ये येणार आहे. पूर्वीच्या चित्रपटापेक्षा हा चित्रपट किती धमाल करेल हे पाहणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिवंगत इरफानचा मुलगा गाजवणार रुपेरी पडदा, ‘या’ दिवशी होतोय पठ्ठ्याचा सिनेमा रिलीज
रंगिन शाम! सोशल मीडियावर सुरभी ज्योतीचा कहर… पाहिले का फोटो?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here