Monday, February 24, 2025
Home कॅलेंडर राखी सावंतबद्दल प्रश्न विचारताच संतापला मिका सिंग, थेट पत्रकाराला केली शिवीगाळ

राखी सावंतबद्दल प्रश्न विचारताच संतापला मिका सिंग, थेट पत्रकाराला केली शिवीगाळ

पंजाबी गायक मिका सिंग (Mika Singh) सध्या त्याच्या ‘स्वयंवर मिका दी वोटी’ या कार्यक्रमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. मिका सिंगला लग्न करायचे असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो त्याच्यासाठी योग्य वधू शोधणार आहे.त्यामुळे या कार्यक्रमाची सध्या त्याच्या चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे. मिका सिंग सध्या या कार्यक्रमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र या प्रमोशनवेळी मिका सिंगला राखी सावंत (Rakhi Sawant) संबंधित प्रश्न विचारल्याने संतापलेल्या मिका सिंंगने या पत्रकाराला शिवीगाळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, पंजाबी गायक मिका सिंग सध्या त्याच्या मिका दी वोटी कार्यक्रमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या कार्यक्रमात तो त्याच्यासाठी वधू शोधणार आहे. त्यामुळे या चर्चित कार्यक्रमाचे तो जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यासाठीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मिकाने पत्रकाराला शिवीगाळ केल्याची बातमी समोर आली आहे. ही पत्रकार परिषद दिल्लीमध्ये झाली असून यामध्ये एका पत्रकाराने मिका सिंगला या कार्यक्रमात राखी सावंत सहभागी होणार का असा प्रश्न विचारला होता. यावेळी या प्रश्नाला उत्तर देणे त्याने टाळले मात्र काही वेळाने कार्यक्रम संपल्यानंतर त्याने आणि त्याच्या टीमने संबंधित पत्रकाराला खोलीत बोलावून शिवीगाळ केली. यावेळी मिका सिंगला त्याची तुलना राखी सावंतबरोबर केल्याचा राग आल्याचे सांगितले जात आहे.

मात्र या सगळ्या प्रकारानंतर या कार्यक्रमाच्या टीमने झालेल्या प्रकाराबद्द्ल सर्वांची माफी मागितली आहे. तसेच घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची विनंती केली आहे. यावेळी मिकाने तिच्याशी माझी तुलना कशी होऊ शकते असे म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान राखी सावंत आणि मिका सिंग यांच्यात 2006 मध्ये वाद झाला होता. एका पार्टीमध्ये सहभागी झालेल्या राखी सावंतला मिका सिंगने सर्वांसमोर किस केला होता ज्यानंतर राखीने मिकाच्या श्रीमुखात भडकावली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
अभिनेत्री राखी सावंतला व्हायचंय आई! म्हणाली, ‘प्रेग्नेंट झाल्यावर दुसऱ्याच दिवशी…’बाबो! कुणापेक्षा कमी नाय, ड्रामा क्वीन राखी सावंतची संपत्ती ऐकून बसेल हादरा

हे देखील वाचा