‘तुला चापट खायची का?’ जेव्हा चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमारने कॅटरिना कैफला दिली होती धमकी!

when bollywood actor akshay kumar wants to slap katrina kaif


बॉलिवूडमध्ये आतापर्यंत बऱ्याच सुपरहिट जोड्या बनल्या आहेत, ज्यांना प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहणे पसंत करतात. ज्यात शाहरुख खान-काजोल, अनुष्का शर्मा-रणवीर सिंग, रणवीर सिंग-दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ-सलमान खान या जोड्या खूप लोकप्रिय आहेत. या सर्वांव्यतिरिक्त आणखी एक जोडी आहे, जी चाहत्यांना खूप आवडते, ती आहे कॅटरिना कैफ-अक्षय कुमारची जोडी.

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफने बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यात ‘हमको दीवाना कर गए’, ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय लवकरच दोघे रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहेत. एवढे सगळे असूनही, एकदा अक्षयने कॅटरिनाला चापट मारण्याची धमकी दिली होती आणि हे स्वतः कॅटरिनाने तिच्या एका मुलाखतीमध्ये उघड केले होते.

वास्तविक, कॅटरिना कैफ अक्षयसोबत, दिग्दर्शक फराह खानच्या ‘तीस मार खान’ या चित्रपटात काम करत होती. यातील ‘शीला की जवानी’ या गाण्याच्या शुटिंगच्या दिवशी रक्षाबंधनचा सण होता. त्यादिवशी कॅटरिनाने पाहिले की, सेटवर बर्‍याच लोकांच्या हातावर राखी बांधलेली आहे. कॅटरिनाला भाऊ नसल्यामुळे, तिने तिथे उपस्थित अक्षय कुमारला विचारले की, तो तिचा राखी भाऊ होईल का? कॅटरिना कैफचे हे बोलणे ऐकून अक्षय कुमार म्हणाला, “कॅटरिनाला चापट खायची आहे?” मात्र हे अक्षयने विनोद करत म्हटले होते.

तसेच, अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट २०२१ मधील, मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षकांना यापुढे आणखी प्रतीक्षा करावी लागू नये, म्हणून चित्रपट निर्माते ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. माध्यमांतील काही वृत्तानुसार, हा चित्रपट हॉटस्टारवर रिलीझ करण्याची डील जवळजवळ पक्की झाली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित करणे, हा तोटाच मानला जातो. निर्माते इच्छित रक्कम कमावू शकत नाहीत. याच कारणास्तव अक्षय कुमार व कॅटरिना कैफ अभिनित बिग बजेट चित्रपट ‘सूर्यवंशी’ एका वर्षापेक्षा अधिक काळापासून रिलीझ होण्याची प्रतीक्षा करत आहे. तसेच, १०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेला हा चित्रपट आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.