माला सिन्हा यांनी ५० च्या दशकपासून ते ७० च्या दशकापर्यंत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळी त्यांचा चेहरा अभिनेत्री नर्गिस यांच्याशी मिळता जुळता आहे, असे सर्वजण म्हणायचे. अभिनेत्री माला सिन्हा लहानपणापासूनच सुपरस्टार राज कपूर यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी भल्या भल्या अभिनेत्री तरसायच्या. परंतु जेव्हा माला यांना पहिल्यांदा ‘परवरीश’ चित्रपटात राज यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. परंतु यावेळी राज यांच्या स्टारडममुळे त्यांना दुर्लक्षित केले गेले होते.
शूटिंगच्या पहिल्याच दिवशी माला ‘शो मॅन’ राज कपूर यांच्याबरोबर जास्त वेळ चित्रीकरण करणार होत्या, ज्यामुळे त्या बऱ्याच घाबरल्या होत्या.
जेव्हा सेटवर माला सिन्हा यांना बोलावण्यात आले, तेव्हा त्यांनी पाहिले की, कॅमेऱ्याचा संपूर्ण फोकस राज कपूर यांच्यावर आहे. त्यांच्यावर कसलाच फोकस नव्हता. संपूर्ण सीनमध्ये फक्त माला सिन्हा याच फक्त संवाद बोलणार होत्या, तेव्हा राज कपूर दिग्दर्शकाला म्हणाले की, ‘हा संपूर्ण देखावा माला यांचा आहे, त्यांचे संवाद आहेत. कॅमेरा फोकस त्यांच्यावर असावा, माझ्यावर नाही.’
जेव्हा माला सिन्हा यांनी राज कपूर यांच्या या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांच्या मनात राज कपूर यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला. त्यांना जाणीव झाली की, राज कपूर हे असे स्टार आहेत, जे आपल्या स्टारडमचा फायदा घेत नाहीत. ते नवीन कलाकारांनाही पुढे जाण्याची संधी देतात.
बॉलिवूड मधील महान दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ या चित्रपटामधील माला सिन्हा यांची भूमिका ही अजरामर आहे. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत भरपूर चढ- उतार आले. परंतु या अभिनेत्रीचे नाव टिकून राहिले.
माला यांनी आतापर्यंत ‘गीत’, ‘आँखे’, ‘धूल का फूल’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो कलियाँ’, ‘दिल तेरा दीवाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-