Friday, July 5, 2024

गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या गंगूबाईने थेट पंतप्रधान नेहरूंनाच केले होते लग्नासाठी प्रपोज, पुढे जे घडलं…

मागील काही दिवसांपूर्वी ज्या सिनेमाचं नाव सगळ्यांच्या तोंडात होतं, तो सिनेमा म्हणजे ‘गंगूबाई काठियावाडी’ होय. गंगूबाई सिनेमाची कथा एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी रिलीझ झालेल्या या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमात आतापर्यंतची सगळ्यात वेगळी भूमिका आलिया भट्ट हिने साकारली होती. तसे आलियाने यापूर्वी अनेक वेगवेगळ्या धाटणीचे रोल साकारलेत. जर उदाहरण घ्यायचं झालं, तर हायवेमधली वीरा, राझीमधली सेहमत, डिअर जिंदगीमधली कायरा आणि गली बॉयमधली सफीना. या भूमिका जरी तिने साकारल्या असल्या, तरीही तिच्यासोबत त्या दर्जाचे अभिनेतेही होते. मात्र, गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा फक्त आणि फक्त आलिया भट्टच्याच खांद्यावर होता.

आता तुम्हाला जवळपास समजलं असेल की, गंगूबाई काठियावाडी कोण असेल आणि तिने काय काय केलंय. गल्ली ते दिल्लीपर्यंत गंगूबाईचा आवाज गाजत होता. तिचा प्रभाव फक्त अंडरवर्ल्ड आणि गुंडांपर्यंतच नव्हता, तर बड्या- बड्या राजकारण्यांपर्यंतही होता. गंगूबाईने महिला सक्षमीकरण शिखर परिषदेत वेश्याव्यवसायाच्या बाजूने असे भाषण दिले होते, जे चर्चेत आले होते. गंगूबाईंची चर्चा त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहोचली होती. हे तर सोडाच, गंगूबाईने थेट नेहरूंनाच लग्नासाठी प्रपोज केले होते. काय होता तो किस्सा, चला जाणून घेऊया…

मुंबईतील रेड लाईट एरिया कामाठीपुरामध्ये असं एकही घर नाही, जिथं गंगूबाईंचा फोटो नसेल. गुजरातच्या एका संपन्न कुटुंबात १९३९ साली जन्मलेली गंगा हरजीवनदास ही मुलगी प्रेमात फसून गंगूबाई झाली. त्यांना अभिनेत्री व्हायचं होतं. त्या वडिलांचे अकाउंटंट रमणिक लाल यांच्या प्रेमात पडल्या आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या पतीने ५०० रुपयांत त्यांचा सौदा केला. गंगूबाईंनी परिस्थितीशी तडजोड केली, पण मनाशी ठरवलं की इतर कोणत्याही मुलीवर असा अन्याय होऊ देणार नाही. गंगूबाईंच्या घरी मोठमोठे गुंड यायचे. त्यावेळी ६० आणि ८० च्या दशकात एका माफियाची चलती होती, तो माफिया म्हणजे करीम लाला. त्यांनी करीम लालालाच आपला भाऊ बनवलं होतं.

गंगूबाईनं रेड लाईट एरियाची स्थिती सुधारण्यासाठी कंबर कसली होती. महिला सबलीकरणाच्या शिखरावर गंगूबाईंनी असं भाषण केलं, ज्याचा आवाज देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पोहोचला. या भाषणात गंगूबाईंनी शहरी भागातील वेश्याव्यवसायावर भर दिला. रेड लाइट एरियाची स्थिती सुधारण्याची त्यांची इच्छा पाहून जवाहरलाल नेहरू प्रभावित झाले होते.

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा गंगूबाईंना जवाहरलाल नेहरूंना भेटण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी नेहरूंना त्यांच्या भाषणातून लैंगिक कामगारांची स्थिती सुधारण्याचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर मांडण्यास सांगितलं. असं काहीतरी करावं, जेणेकरुन लैंगिक उद्योगातील महिलांना समान हक्क मिळावेत आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता येईल, असं आवाहनही गंगूबाईंनी त्यांना केले.

अशा प्रभावी वक्तव्यामुळं जवाहरलाल नेहरूही गंगूबाईंवर खूप प्रभावित झाले होते. भेटीदरम्यान, त्यांनी गंगूबाईंना विचारले की, एक चांगला नवरा निवडून चांगले जीवन जगू शकत असताना त्यांनी ही नोकरी का निवडली. असं म्हणतात की, यावर गंगूबाईंनी नेहरूंना विचारलं, “तुम्ही मला मिसेस नेहरू बनवाल का?” जवाहरलाल नेहरूंकडे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, तेव्हा गंगूबाई म्हणाल्या, “उपदेश करणं खूप सोपं आहे, पण करणं अवघड आहे.”

तर अशाप्रकारे गंगूबाईंनी थेट पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनाच लग्नाची मागणी घातली होती, ज्यावर नेहरूही निरुत्तर राहिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
राज कपूरांनी संधी देऊनही मागच्या दारातून हेमा मालिनीने ठोकली होती धूम! तरीही सिनेमा ठरला सुपरहिट
एक- दोन नाही, तर तब्बल ५ लाख शेतकरी होते ‘या’ सिनेमाचे निर्माते, प्रत्येकाने दिलेलं २ रुपयांचं कर्ज
‘सीरियल किसर’ इमरान हाश्मीचा ‘तो’ सिनेमा पाहण्यासाठी थेट पाकिस्तानच्या थेटरात झालेली चेंगराचेंगरी

हे देखील वाचा