Friday, March 29, 2024

‘डार्लिंग्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया भट्टने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने

आलिया भट्ट (alia bhatt) सध्या जोरदार चर्चेत आहे. तिचा एका मागून एक असे अनेक सुुुपरहिट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच तिच्या आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तिच्या ‘डार्लिंग्स’ (darlings) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने तिने सगळ्यांची मने जिंकली आहेत. या ट्रेलरमध्ये तिचा हटके अंदाज दिसत आहे. यात ती घरगुती अत्याचाराची शिकार झालेली दिसत आहे. परंतु नंतर पतीच्या याच अत्याचाराला कंटाळून ती तिला झालेल्या सगळ्या त्रासाचा बदला देखील घेते. या चित्रपटात तिच्यासोबत शेफाली शाह, (shefali shah) विजय वर्मा (vijay verma) रोशन मैथ्यू आणि राजेश शर्मा (rajesh sharma) हे कलाकार देखील महत्वाच्या भूमीकेत दिसत आहेत. 

आलिया भट्टने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ट्रेलर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा ट्रेलर शेअर करून तिने लिहिले आहे की, “एक निर्माती म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मी खूपच उत्साहित, नर्वस आणि इमाशनल फिम करत आहे.”  खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट आलिया शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीजसोबत मिळून बनवलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in) 

 

आलिया भट्टने तिच्या अभिनयान् तिचा एक वेगळा असा चाहता वर्ग तयार केला आहे. तिचा अभिनय देखील अनेकांना आवडतो. तिने तिचा एक वेगळे स्थान निर्मान केले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु आता एक निर्माती म्हणून ती काय कमाल करू शकते हे पाहण्यास उत्सुकता लागली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “काळजीपूर्वक पाहा या प्रेमात काहीतरी हानिकारक आहे. डार्लिंग्स हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता.”  ट्रेलर पाहून चित्रपट काहितरी खास असणार आहे, याची प्रचिती येत आहेत. तिचे चाहते देखील तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘माझ्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते’, अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करता न आल्याने सनी देओलचे स्पष्टीकरण‘या’ अभिनेत्रीसाठी कुमार गौरवने दिला होता राज कपूर यांच्या मुलीला लग्नासाठी नकारअक्षय कुमारला आयकर विभागाने का पाठवले सन्मानपत्रक? जाणून घ्या मोठे कारण

 

 

हे देखील वाचा