बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि वाद हे एक समीकरणच झाले आहे. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. समाजातील विविध घटकांवर ती तिचे मत मांडत असते. काही महिन्यांपूर्वी कंगनाने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यावर असे काही व्यक्तव्य केले की तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
कंगनाने सावरकर, लक्ष्मीबाई आणि नेताजी बोस यांच्याबाबत सांगितले की, “लोकांना माहीत आहे की, रक्त वाहणार आहे. परंतु ते हिंदुस्तानी रक्त नसायला पाहिजे. ते स्वातंत्र्य नव्हते आणि स्वातंत्र्य मिळाले ते २०१४ मध्ये.” (Kangana Ranaut says india got real freedom in 2014, actress troll on social media)
कंगना प्रेक्षकांना विचारते की, “जे स्वातंत्र्य आपण भिक मागून मिळवले ते स्वातंत्र्य असू शकते का?” यामध्ये एक अँकर कंगनाला म्हणते की, “म्हणून लोकं तुम्हाला देव म्हणतात.” यानंतर सगळे कंगनाच्या बोलण्यावर टाळ्या वाजवतात. कंगनाचा हा व्हिडिओ शेअर करून युजर्स तिला ट्रोल करत आहे. स्वरा भास्करने कंगनाचा हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “कोण आहेत हे मूर्ख लोक जे टाळ्या वाजवत आहे? मला जाणून घ्यायचे आहे.”
वरुण गांधीने ट्विट केले आहे की, “कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान तर कधी हत्यारांचा सन्मान आणि आता शहिद मंगल पांडेपासून ते राणी लक्ष्मीबाई, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद यांसारख्या कितीतरी लोकांच्या त्यागाचा तिरस्कार. या विचाराला मी वेडेपणा म्हणू की, देशद्रोह?”
लकड़ी के घोड़े पर प्लास्टिक की तलवार लेकर वीरांगना बनने वाली सरकारी चाटुकार आजादी के सिपाहियों का अपमान कर रही है। हज़ारों कुर्बानियों के नतीजे को भीख बता रही है। pic.twitter.com/gH4JbOd4l9
— Rofl Gandhi 2.0 ???? (@RoflGandhi_) November 10, 2021
कंगनाला ‘पद्म श्री’ या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर तिने सांगितले की, “जेव्हा मी कोणत्याही मुद्यावर माझे मत मांडते तेव्हा लोक म्हणतात की, तुला या मुद्यांपासून दूर राहिले पाहिजे. त्या सगळ्यासाठी माझा हा पुरस्कार आहे. मला अशी आशा आहे की, या पुरस्काराने त्या लोकांची बोलती बंद होईल.”
कंगनाने हे देखील सांगितले की, “मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न येत होता की, काही लोक पैशासाठी काम करतात तर काहीजण लोकप्रिय होण्यासाठी काम करतात. तर मी नेमके कशासाठी काम करू? मला तेव्हा विश्वास होता की, मला काम करून इज्जत कमवायची आहे.”
कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अर्जुन राजपालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सोबतच ती ‘तेजस’, मणीकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ जिद्दा’, ‘टिकू वेड्स शिरू’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. ती एक अभिनेत्रीसोबत निर्माती देखील आहे. तिने तिच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साई कबीर हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-