Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

करण जोहरच्या ‘या’ कृतीमुळे संपूर्ण मंगेशकर कुटुंब झाले होते नाराज, स्टेटमेंट काढत विचारले होते अनेक प्रश्न

लता मंगेशकर बस नावच पुरेसे आहे, कर्तृत्व लक्षात येण्यासाठी. जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास असणाऱ्या लता दीदींचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींनी त्यांच्या करिअरमध्ये अमाप यश पाहिले. त्यांना त्यांच्या आयुष्यात नाव, पैसा, एशोआराम आदी सर्वच गोष्टी लाभल्या. त्यांनी जे यश पाहिले ते अजूनपर्यंत इतर कोणालाही मिळायचे दिसत नाही. ते असूनही दीदींनी त्यांचा साधेपणा कधीच सोडला नाही. त्या नेहमीच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या ओळींवर विश्वास ठेऊन जगल्या. साडी पांढरी किंवा मोठी रंगाची साडी आणि खांद्यावरून पदर ही त्यांची वेशभूषा. कानात दोन हिऱ्यांची कुडी आणि हातात एक एक हिऱ्याचीच बांगडी आणि लांबसडक केसांच्या दोन वेण्या याच सध्या अवतारात दीदी नेहमी असायच्या. त्यांनी जवळपास ३० हजारांपेक्षा अधिक गाणी गायली मात्र या गाण्यांमध्ये कोणताही त्यांनी कोणतेही असे गाणे गायले नाही ज्यात आपत्तीजनक, अश्लील शब्द असणारे किंवा त्यांना न पटलेले. मात्र एकदा करण जोहर आणि कियारा अडवाणी यांनी असे काही केले ज्यामुळे लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबीय नाराज झाले होते.

एक रिपोर्टनुसार जेव्हा करण जोहरने त्याच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीजच्या एका भागात लता दीदींचे एक आयकॉनिक गाणे री क्रिएट करून वापरले होते. या गाण्याचे हे नवीन व्हर्जन आणि ते गाणे ज्या परिस्थितीसाठी वापरले गेले त्यावरून मंगेशकर कुटुंबीय नाराज झाले होते. त्यांच्या कुटुंबाकडून एक स्टेटमेंट कढत त्यांनी त्यात सांगितले होते की, “आम्ही खूपच हैराण झालो आहोत लता दीदींनी गायलेले भजन त्या सीनसाठी लावण्याची काय गरज होती. तिथे दुसरे कोणतेही गाणे वापरता आले असते. त्या अभिनेत्रीने ‘तो’ सीन करावा यासाठी दीदींचे आयकॉनिक गाणे वापरण्याची गरज नव्हती.”

kiyara advani
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/netflix

यात कुटुंबाकडून असे देखील सांगण्यात आले होते की, हे गाणे अशा सीनसाठी वापरताना लता मंगेशकर यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. पुढे त्यांनी सांगितले की, “त्यांच्या या वयात आम्हाला वाटत नाही की त्यांच्या गाण्यांसोबत असे काही व्हावे. करण जोहरने दीदींच्या गाण्याचा असा वापर का केला. जेव्हा ‘हे’ गाणे दीदींनी करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमासाठी गायले होते तेव्हा तो म्हणाला होता की, ‘त्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.’ मग आता ते स्वप्न उध्वस्त का केले?”

कियारा अडवाणीच्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ने खूपच लाईमलाइट मिळवले. यासोबतच कियारा अडवाणींच्या ‘त्या’ सीनने देखील तुफान चर्चा मिळवली. या सिरीजमध्ये कियारासोबत विकी कौशल देखील झळकला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा