Thursday, June 13, 2024

रेखाला ‘हडळीण’ म्हणत नर्गिसने केलं होतं धक्कादायक विधान; म्हणालेली, ‘ती मर्दांना असे इशारे करायची जसे…’

बॉलिवूड आणि त्यातील कलाकारांमधील वाद हा काय नवीन विषय नाही. अनेकदा सिनेमाच्या सेटवर कलाकारांमध्ये बिनसल्यामुळे संबंध बिघडले आहेत. कधीकधी भलत्याच कारणांमुळे दोन अभिनेत्रींमध्ये वादात ठिणगी पडल्याचेही आपण पाहिले आहे. यामध्ये रेखा या एव्हरग्रीन अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे. रेखा यांची कारकीर्द नेहमीच वादाने भरलेली राहिली आहे. त्यांनी जितके नाव सिनेमातून कमावले, त्याहून अधिक त्या अफेअर्समुळे चर्चेत राहिल्या. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते संजय दत्त याच्यापर्यंत रेखांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या. त्यांच्यावर घर तोडण्याचाही आरोप लागला आहे. रेखा आणि नर्गिस दत्त यांच्यातही बिनसले होते.

रेखांवर भडकलेल्या नर्गिस
नर्गिस दत्त (Narigs Dutt) यांना अभिनेत्री रेखा (Rekha) बिल्कुल आवडत नव्हत्या. यामागील कारण त्यांचे पती सुनील दत्त (Sunil Dutt) आणि मुलगा संजय दत्त (Sanjay Dutt) होते. दोन्ही अभिनेत्यांसोबत रेखाने अनेक सिनेमात काम केले होते. त्यानंतर दोघांसोबत रेखाच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हे नर्गिस यांना बिल्कुल आवडले नाही. ज्यावेळी नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्यासोबत रेखाच्या नात्याच्या चर्चा ऐकल्या, तेव्हा त्या संतापल्या आणि रेखांना आपले शत्रू मानले होते.

मुलाखतीत धक्कादायक वक्तव्य
नर्गिस यांनी 1976मध्ये माध्यमांना एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी रेखा यांच्याविषयी मोकळेपणाने भाष्य केले. वृत्तांनुसार, त्यांनी रेखा यांच्यावर निशाणा साधत म्हटले होते की, “रेखा पुरुषांना अशाप्रकारे इशारे देत होती, जसे ते सहजरीत्या तिच्यासाठी उपलब्ध आहेत. काही लोकांच्या नजरेत ती हडळीणपेक्षा कमी नाहीये.” नर्गिस एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या होत्या की, “कधीकधी मला वाटते की, मी रेखाला जास्त ओळखू लागले आहे. मात्र, आता मी तिची अडचण समजू शकते. मी माझ्या आयुष्यात असे अनेक मुलांसोबत काम केले आहे, ज्यांना मानसिक अडचण असते. रेखा नेहमीच हरवलेली असते. तिला एका मजबूत पुरुषाची खूपच गरज आहे.”

संजय दत्तने दिले होते रेखासोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण
नर्गिस त्यांच्या साधेपणासाठी ओळखल्या जायच्या, पण जेव्हा त्यांनी रेखाविषयी भाष्य केले, तेव्हा संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीत खळबळ माजली होती. धक्कादायक बाब अशी होती की, रेखा यांचे फक्त सुनील दत्त यांच्यासोबतच नाही, तर नर्गिस यांचा मुलगा आणि अभिनेता संजय दत्त याच्यासोबतही नाव जोडले गेले होते. 1984मध्ये रेखाने संजय दत्तसोबत ‘जमीन आसमान’ सिनेमात काम केले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच, जेव्हा रेखा आणि संजय दत्तच्या लग्नाविषयी बातम्या आल्या होत्या, तेव्हा संजय दत्तने स्पष्टीकरण देत सर्व बातम्यांना अफवा म्हटले होते. (when nargis dutt said about rekha this mardon ko signal deti hai read more here)

महत्त्वाच्या बातम्या-
पलक तिवारीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! आईबाबत खुलासा करत म्हणाली, ‘मी कुणाला डेट करू नये म्हणून ती माझे…’
“कुंपण ओलांडून रिंगणात उतरण्याची वेळ” राजकारणात येण्याच्या ‘त्या’ प्रश्नावर केदार शिंदे यांचे सूचक विधान

हे देखील वाचा