Thursday, September 28, 2023

पलक तिवारीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! आईबाबत खुलासा करत म्हणाली, ‘मी कुणाला डेट करू नये म्हणून ती माझे…’

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी होय. श्वेताला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. मोठा काळ उलटल्यानंतरही श्वेता चाहत्यांची आवडती अभिनेत्री आहे. 42व्या वयातही श्वेता सुंदरतेच्या बाबतीत तरुण अभिनेत्रीला टक्कर देते. श्वेता तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही भलतीच चर्चेत राहिली आहे. श्वेताला 22 वर्षांची मुलगी असून तिचे नाव पलक तिवारी आहे.  पलकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अशातच पलक तिवारीने धक्कादायक खुलासा केला आहे.

काय म्हणाली पलक?
अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari) हिने माध्यमांशी बोलताना म्हटले की, एक वेळ होती, जेव्हा तिची आई श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने तिचे आयुष्य खराब करून ठेवले होते. ती म्हणाली की, “माझे बालपण खूपच खराब होते. माझी आईने तो काळ भयानक बनवला. माझी सर्वात मोठी अडचण ही होती की, मी खूप खोटे बोलायचे आणि लोक मला पकडायचे. माझी आई म्हणायची की, ‘तू दोन तासात पकडली जाते, तर खोटं बोलण्याचा त्रास का करून घेतेस?’ मला आठवते की, माझा एक बॉयफ्रेंड होता. मी 15 किंवा 16 वर्षांची होते. जसा शाळेत तुमचा कोणतातरी बॉयफ्रेंड असतो.”

श्वेताने कापले होते पलकचे केस
पुढे बोलताना पलक म्हणाली की, “आम्हाला मॉलमध्ये जायला आवडायचे. त्यामुळे मी त्याच्यासोबत मॉल जात होते आणि त्यावेळी मी माझ्या आईला म्हटले की, मी लपाछुपी खेळण्यासाठी खाली जात आहे. माझ्या आईने ठीक आहे म्हटले. मात्र, ती शहरात नव्हती आणि लगेच तिला समजले की, मी खेळायला गेले नाहीये. तिला समजले की, मी मॉलमध्ये होते. तिला खूपच राग आला. मजेशीर बाब अशी की, माझी आई म्हणायची की, ‘मी तुला गावाला पाठवेल, मी तुझे केस कापेल.’ जेव्हा मी लहान होते, तेव्हा तिने मला कुरुप बनवण्यासाठी माझे केसही कापले होते. जेणेकरून मी कुणालाच डेट करू शकणार नाही.”

राजा चौधरी आणि श्वेताची मुलगी आहे पलक
पलक ही राजा चौधरी आणि श्वेता तिवारीची मुलगी आहे. राजाविरुद्ध श्वेताने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. त्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे लग्नही फार काळ टिकले नाही.

दुसरीकडे, 22 वर्षीय पलकला सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत अनेकदा बघितले गेले आहे. दोघेही एकसोबत मूव्ही डेटलाही गेले होते. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवांना खतपाणी मिळाले. काही दिवसांपूर्वी पलक, सारा आणि इब्राहिमसोबत गोव्यालाही गेली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

पलकचे बॉलिवूड पदार्पण
पलकने सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले आहे. या सिनेमातून शहनाज गिल हिनेही बॉलिवूड पदार्पण केले आहे. (actress shweta tiwari cut her daughter hair to make her look ugly palak tiwari shocking revelation)

महत्त्वाच्या बातम्या-
“कुंपण ओलांडून रिंगणात उतरण्याची वेळ” राजकारणात येण्याच्या ‘त्या’ प्रश्नावर केदार शिंदे यांचे सूचक विधान
दोन आठवडे घाम गाळून अभिनेत्याने अंधारात शूट केले ऍक्शन सीन्स, 300 कोटी बजेटचा सिनेमा कधी होणार रिलीज?

हे देखील वाचा