‘आपकी नजरों ने समझा…प्यार के काबिल मुझे’ आणि ‘धीरे धीरे चल चांद गगन में’ या गाण्यांमध्ये आपल्या मोहक हास्याने लोकांना वेड लावणाऱ्या माला सिन्हा ह्यानी 40 वर्षे बॉलिवूडवर राज्य केले आहे. यादरम्यान त्यांनी एकापेक्षा एक चित्रपट दिले. असे म्हटले जाते की, 60 ते 80 च्या दशकापर्यंत त्यांचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत होते. त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक वेडे व्हायचे, पण त्या त्यांच्या खऱ्या आयुष्यात बॉलिवूडमधील सर्वात कंजूष अभिनेत्री मानल्या जायच्या. त्याचा कंजूषपणा इतका होता की त्याच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते. यादरम्यान, माला यांनी त्यांचे पैसे वाचवण्यासाठी मीडिया आणि कोर्टासमोर असे काही बोलली होती, जी ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.
तर झाले असे की, जेव्हा माला सिन्हा (mala sinha) यशाच्या शिखरावर हाेत्या त्यावेळी त्यांच्या जीवनात एक अशी वेळ आली ज्याने त्यांच्या आनंद आणि शांततेला धक्काच दिला होता. हे प्रकरण आयकराशी संबंधित होते. माध्यमातील वृत्तानुसार, 1978 मध्ये माला सिन्हाच्या मुंबईतील घरावर आयकर छापा टाकण्यात आला होता. छाप्यात त्याच्या बाथरूममधून 12 लाखांचे बंडल जप्त करण्यात आले. त्या काळात 12 लाख रुपये ही मोठी रक्कम होती.
माध्यमातील वृतानुसार, हे प्रकरण इतके मोठे होते की ते कोर्टात पोहोचले. आपली कमाई जप्त होऊ शकते या विचाराने माला सिन्हा खूप अस्वस्थ झाल्या हाेत्या. त्यामुळे वकील आणि वडील अल्बर्ट सिन्हा यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पैसे वेश्याव्यवसायातून कमावल्याची कबुली कोर्टात दिली.
माला यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वांनाच खूप माेठा धक्का बसला. लोक त्यांना खूप वाईट म्हणू लागले. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली आणि काही दिवसानंतर अभिनेत्री फार खचून गेल्या.(when piles of notes found in actre`s`s mala sinha bathroom confessed prostitution in front of court career damaged in on stroke )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पांढऱ्या रंगाची साडी नेसून जान्हवी उतरली पाण्यात, फाेटाे बघताच युजर्सला आठवली ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी
जबरा फॅन! ‘पठाण’ चित्रपटाचं तिकिट मिळत नसल्याने चाहत्यांने थेट शाहरुख खानकडेच घेतली धाव म्हणाला…