Thursday, November 30, 2023

माला सिन्हा यांच्या मांडीवर बसलेल्या ‘या’ मुलाला ओळखले का? आज करतोय बॉलिवूडवर राज्य

दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री माला सिन्हा (Mala sinha) हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री एका मुलाला आपल्या मांडीवर घेत आहे. आता नेटिझन्स या मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही या मुलाला ओळखू शकता का?. माला सिन्हाचा हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो पाहता हा फोटो एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढण्यात आल्याचे दिसते.

माला सिन्हाच्या मांडीवर बसलेल्या या मुलाच्या नावाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट आहेत. त्याने 1995 मध्ये ‘बरसात’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि ‘बरसात’साठी त्याला ‘फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल डेब्यू’ देखील मिळाला. यानंतर त्यांनी ‘बादल’, ‘सोल्जर’, ‘अजनबी’ आणि ‘हमराज’ सारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

आतापर्यंत तुम्ही त्यांना ओळखलेच असेल. होय, माला सिन्हाच्या मांडीवर बसलेला हा मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा सुपरस्टार बॉबी देओल आहे. माला सिन्हाने बॉबी देओलचे (Boby deol) वडील धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत आणि दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.

बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या माला सिन्हाने अनेक हिंदी, बंगाली आणि नेपाळी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. माला सिन्हा उर्फ ​​अल्दा सिन्हा यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी कोलकाता येथे झाला. बंगाली चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. गुरू दत्त यांच्या ‘प्यासा’ आणि ‘धूल का फूल’ या चित्रपटांनी त्यांना बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. माला सिन्हा यांनी त्या काळातही अनेक स्त्रीकेंद्रित चित्रपट केले होते आणि ती एक ‘अपारंपरिक’ अभिनेत्री मानली जात होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चंदन प्रभाकरने सांगितले ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्यामागील कारण, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
राजकारणाच्या मैदानात उतरणार केआरके; म्हणाला, ‘देशाला अभिनेत्याची नाहीतर नेत्याची गरज आहे’
ऋतिकच्या कथित गर्लफ्रेंडचा माेठा खुलासा! सांगूनच टाकलं का बदललं आडनाव

हे देखील वाचा