Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

विश्वसुंदरी असलेली प्रियांका चोप्रा देशात नाही तर परदेशातही तुफान लोकप्रिय आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने प्रियंकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमधेही तिने तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से आहेत जे मीडियामध्ये खूप हिट आहेत. तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी चाहते नेहमीच उत्साहित असतात. तसेच ती नेहमी मुलाखतीमध्ये मजेदार असे किस्से सांगत असते. अशातच तिने तिचा एक बालपणीचा किस्सा सांगितला होता. त्या मुलाखतीत तिने सांगितले की, मला एका माकडाने मारले होते. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक हसायला लागले होते.

प्रियांका २०१७ मध्ये ही कपिल शर्माच्या सेटवर गेली होती. यादरम्यान तिने तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला. तिने सांगितले की, ती तिसरीत असताना ही घटना घडली होती. शाळेच्या बाहेर भरपूर झाडे होते. तिथल्याच एका झाडावर तिला माकड बसलेला दिसला. तो खूपच खाजवत होता. हे पाहून तिला खूप हसायला आले, ती तिचे हसणे रोखू शकले नाही आणि जोरजोरात हसायला लागली होती.

तिने सांगितले की, “माकडाने मला हसताना पाहिले होते. माकडाला माझा खूप राग आला. त्यामुळे माकड झाडावरून खाली उतरला आणि माझ्या कानाखाली मारून, परत झाडाच्या दिशेने गेला. ती हे सगळं स्तब्ध होऊन बघतच राहिली. तिला आजही हा किस्सा आठवतो. हा किस्सा घडला होता तेव्हा प्रियांका खूप घाबरली होती, पण आज हाच किस्सा परत आठवला की, तिला खूप हसायला येते.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या तिच्या आगामी स्पाय थ्रिलर ड्रामा ‘सिटाडेल’चा सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने स्वतः चित्रपटात अनेक स्टंट केले आहेत, ज्यामुळे तिला अनेक दुखापतीही झाल्या होत्या. तिने आपल्या भुवया आणि डोक्याला झालेल्या दुखापतीची फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते. तसेच ती नेहमी चाहत्यांसोबत आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे जुडलेली असते. सतत सोशल मीडियावर आपल्या फोटोज आणि व्हिडिओमुळे ती चर्चेत राहते असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

-‘प्रिय मोदीजी अमेरिका दौऱ्यावरुन येताना माझ्यासाठी ‘या’ गोष्टी आणा’, राखी सावंतची पंतप्रधानांकडे अजब मागणी

-‘लोकांना असे वाटते की मी…’, म्हणत राखीने शेअर केले तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो

-ट्विंकल खन्नाने केले ‘वन मॅन आर्मी’ असलेल्या राखी सावंतचे कौतुक, राखीने मानले आभार

हे देखील वाचा