Tuesday, March 5, 2024

जेव्हा ‘या’ अभिनेत्याच्या लग्नाच्या वरातीत एकत्र पोहचले राज कपूर-दिलीप कुमार, अनसीन फोटो व्हायरल

दिवंगत अभिनेते प्रेम नाथ (Prem Nath) यांनी 1952 मध्ये अभिनेत्री बीना राय (Bina rai) यांच्याशी लग्न केले. त्यांचे मेहुणे आणि अभिनेता राज कपूर (Raj Kapoor) यांच्यासोबत दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनीही लग्नाला हजेरी लावली होती. गेल्या वर्षी दिलीप कुमार यांचा राज कपूर, त्यांचा मुलगा रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोला चाहत्यांनीही भरभरून प्रेम दिले होते. खरं तर, पुन्हा एकदा राज कपूर आणि दिलीप कुमार यांचा जुना न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नाचे वराती म्हणून पोहोचले राज कपूर आणि दिलीप कुमार
फोटोमध्ये प्रेमनाथ घोड्यावर बसलेले दिसत आहेत. फोटोमध्ये अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमारही वरातीत उभे असल्याचे दिसत आहे. फिल्मफेअरच्या मुलाखतीत, प्रेम नाथ यांचा मुलगा मॉन्टी प्रेम नाथ याने त्याच्या पालकांच्या प्रेमकथेबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, “आई बाबांची फॅन होती. त्यांनी पहिल्यांदा 1963 मध्ये ‘औरत’ चित्रपटात एकत्र काम केले होते. एका सुपरस्टारसमोर आई नर्वस होती. तिच्या साधेपणाने बाबा प्रभावित झाले. हळूहळू दोघेही प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. रणधीर कपूर त्यावेळी खूपच लहान होते, लग्नाच्या वेळी ते बाबांसोबत घोड्यावर बसले होते.” (when raj kapoor and dilip kumar attended prem nath and bina rai wedding in 1952)

प्रेमनाथ यांनी लग्नानंतर केले ‘इतके’ चित्रपट
मॉन्टी प्रेम नाथ पुढे म्हणाले, “लग्नानंतर माझ्या आई-वडिलांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली. त्यांनी 1953 मध्ये ‘शगुफा’ हा चित्रपट बनवला, जो फारसा चालला नाही. त्यानंतरचे ‘प्रिझनर ऑफ गोलकोंडा’, ‘समुंदर’, ‘हमारा वतन’ आणि ‘चंगेज खान’ हे चित्रपटही फ्लॉप ठरले. लग्नानंतर तिची मोहिनी कामी आली नाही. पण आईचे ‘अनारकली’, ‘ताजमहाल’, ‘घुंगट’ हे चित्रपट हिट झाले.” खरं तर ‘घुंगट’साठी अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. (when raj kapoor and dilip kumar attended prem nath and bina rai wedding in 1952)

अधिक वाचा-
अशाेक कुमारांच्या लोकप्रियतेमुळे चाहत्यांच्या गर्दीवर पाेलिसांना करावा लागायचा लाठीचार्ज
बंगाली अभिनेत्रीमुळे मिळाला बॉलिवूडचा पहिला ‘ग्लॅमर’ चेहरा! दिलीप कुमार यांच्याशी होते खास नाते

हे देखील वाचा