हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी चित्रपट जगतात प्रचंड यश मिळवले आहे. मात्र इथपर्यंत येण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. यामध्ये अभिनेते राजेश खन्ना (rajesh khanna) यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपट जगतात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. मात्र पैशाच्या हव्यासापोटी एका चित्रपटासाठी स्क्रिप्ट न वाचता होकार दिला होता ज्यामुळे त्यांना पश्चाताप करावा लागला होता. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.
राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट जगतातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी ९० चा काळ चांगलाच गाजवला होता. राजेश खन्ना यांच्या वडीलांना त्यांनी चांगला अभ्यास करुन नोकरी करावी अशी इच्छा होती. मात्र राजेश खन्ना यांना अभिनयाची आवड होती आणि त्यांनी याच क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात राजेश खन्ना यांना पैशाची अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे त्यांनी एका चित्रपटाला स्किप्ट न वाचताच होकार दिला होता. हा चित्रपट होता’ हाथी मेरे साथी’. या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांनी 5 लाख रुपये इतके मानधन घेतले होते. त्या काळात ही मोठी रक्कम समजली जायची. याबद्दल एका मुलाखतीत चित्रपट निर्माते धीरज कुमार यांनी एका किस्सा सांगितला होता. या घटनेची आठवण सांगताना ते म्हणाले की, “एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्यांनी मला खोलीत बोलावले आणि सुटकेस उघडून पैसे दाखवले होते. इतके पैसे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते.”
मात्र राजेश खन्ना यांची खरी पंचायत तेव्हा झाली, जेव्हा त्यांनी चित्रपटाची कथा वाचली. ही कथा वाचून त्यांना घामच फुटला. कारण या कथेवर चित्रपट बनवला तर तो चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांना सलीम खान यांची आठवण झाली. त्यांनी सलीम खान यांना याबद्दल सांगत मी आधीच पैसे घेतल्याचे कबूल केले आणि यावर मार्ग काढण्याचा उपायही विचारला होता. त्यानंतर जावेद अख्तर यांनीही यामध्ये मध्यस्थी केली. मात्र या स्किप्टमध्ये आम्हाला पाहिजे असा बदल करु अशी अट त्यांनी ठेवली होती. याच सलिम-जावेद जोडीने कथेत बदल करत या चित्रपटाची निर्मिती केली आणि इतिहास घडवला होता. चित्रपटात राजेश खन्ना आणि तनुजाच्या जोडीची जोरदार चर्चा झाली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
…म्हणून अपयश पचवण्याची ताकद हवी, चाहते आपल्याला कंटाळलेत कळताच राजेश खन्ना यांना आला होता पॅनिक अटॅक
वेडे प्रेम! राजेश खन्ना यांची तब्येत बिघडल्यावर चाहत्यांनी केलेल्या ‘या’ कृत्यामुळे काका झाले होते भावुक