Friday, April 19, 2024

वेडे प्रेम! राजेश खन्ना यांची तब्येत बिघडल्यावर चाहत्यांनी केलेल्या ‘या’ कृत्यामुळे काका झाले होते भावुक

अभिनेते राजेश खन्ना हे नुसते नाव नसून ते भारतीय चित्रपटाची ओळख आहेत. राजेश खन्ना हे भारतीय चित्रपटसृष्टीचे असे सुपरस्टार आहेत ज्यांना प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रेम मिळाले आहे. राजेश खन्ना यांना आजही इंडस्ट्रीतील पहिल्या सुपरस्टारचा दर्जा मिळतो. त्यांच्याबद्दल असे म्हटले जात होते की, ‘ऊपर आका और नीचे काका’, राजेश खन्ना यांच्या प्रभावाखाली नसलेला 70 च्या दशकातील क्वचितच कोणी तरुण असेल. काकांच्या चाहत्यांशी संबंधित कथा आजही इंडस्ट्रीत सांगितल्या जातात. आज आपण अशीच एक गोष्ट जाणून घेऊया. ‘आराधना’, ‘आनंद’, ‘दो रास्ते’, ‘कटी पतंग’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘बावर्ची’ यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या राजेश खन्ना यांची एकेकाळी खूप मोठी फॅन फॉलोविंग होती.

राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी एकापेक्षा एक सुंदर, आशयसंपन्न आणि हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. राजेश खन्ना नुसते नाव जरी उच्चारले तरी त्यांच्या हिट चित्रपटांची नावे सर्रकन नजरेआड होतात. 1969 ते 1971 या तीन वर्षांच्या काळात त्यांनी 15 चित्रपट लागोपाठ हिट दिले. त्यांचे यश आणि लोकप्रियता बघता, प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला त्यांच्यासोबत काम करायचे होते. त्यांच्या घराबाहेर दिग्दर्शकांची रांग लागलेली असायची. प्रत्येकालाच वाटायचे की, राजेश खन्ना यांनी त्यांच्या चित्रपटात काम करावे. सिनेमात राजेश खन्ना म्हटले की, तो चित्रपट प्रदर्शनाआधीच हिट समजला जायचा.

असे म्हटले जाते की, मुली राजेश खन्ना यांच्यावर अशाप्रकारे मरत होत्या की, त्यांची गाडी किस घेऊन लाल करायच्या. एवढंच नाही तर एकेकाळी मुलंही राजेश खन्ना यांच्यासारखी हेअरस्टाईल करत असत. तसेच अभिनेत्याने घातलेला कुर्ताही एकेकाळी ट्रेंडमध्ये होता. राजेश खन्ना यांच्याशी संबंधित आणखी एक मजेदार किस्सा म्हणजे एकदा काकांची तब्येत बिघडली होती.

माध्यमांतील वृत्तानुसार, राजेश खन्ना यांना खूप ताप आला होता. ही बाब त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचताच सर्वजण अस्वस्थ झाले. राजेश खन्ना यांच्या तंदुरुस्तीसाठी सर्वत्र पूजेचा फेरा सुरू झाला. राजेश खन्ना यांच्यासाठी काही चाहत्यांनी उपवास ठेवल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर अनेक मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी विशेष पूजेची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, एक पाऊल पुढे जात राजेश खन्ना यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्या पोस्टरवर थंड पाण्याच्या पट्ट्या टाकण्यास सुरुवात केली. 2012 मध्ये राजेश खन्ना यांनी कर्करोगाशी लढा देत अखेरचा श्वास घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –
जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर गेल्यावर थरथरू लागले होते राजेश खन्ना, गडबडीत डायलॉगही बोलले उलटे-पालटे
तर ‘या’ कारणामुळे डिंपल कपाडिया यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतरही राजेश खन्नांना नव्हता दिला घटस्फोट

हे देखील वाचा