Thursday, November 14, 2024
Home बॉलीवूड जेव्हा रजनीकांत यांनी सांगितले होते ऐश्वर्याचा हिरो बनण्याची गोष्ट; ‘बिग बी’ झाले होते लोटपोट

जेव्हा रजनीकांत यांनी सांगितले होते ऐश्वर्याचा हिरो बनण्याची गोष्ट; ‘बिग बी’ झाले होते लोटपोट

सर्वात सुंदर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सुपरस्टार रजनीकांत यांनी 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोबोट’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांची जोडी चांगलीच गाजली होती. एक वेगळी कथा घेऊन आलेला हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे रजनीकांत आणि ऐश्वर्याच्या या चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. एका मुलाखती दरम्यान रजनीकांत यांनी या चित्रपटातील अनेक किस्से शेअर केले आहेत. (When Rajnikanth told about Aishwarya Rai hero Amitabh Bachchan could not stop laughing)

एका मुलाखतीदरम्यान रजनीकांत यांनी सांगितले होते की, त्यांच्या भावाच्या शेजारी राहणारा त्याचा एक राजस्थानी चाहता हे ऐकून खूप हैराण झाला होता की, ऐश्वर्याच्या चित्रपटात रजनीकांत हा हिरो आहे. या मुलाखतीदरम्यान तिथे अमिताभ बच्चन देखील उपस्थित होते. रजनीकांत यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून अमिताभ बच्चन हसू लागले होते.

सुपरस्टार रजनीकांत यांनी 2010 साली ऐश्वर्या रायसोबत ‘रोबोट’ या चित्रपटात काम केले होते. त्या दोघांमध्ये 23 वर्षाचे अंतर आहे. तरी देखील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

रजनीकांत यांनी मुलाखतीत या चित्रपटातील अनेक किस्से शेअर केले. रजनीकांत हे त्यावेळी त्यांच्या भावाला भेटण्यासाठी बँगलोरला गेले होते. त्यांच्या भावाच्या शेजारीच त्यांचा एक राजस्थानी चाहता राहत होता. रजनीकांत तिथे आले आहेत, हे समजता क्षणीच तो रजनीकांत यांना भेटायला आला. 60 वर्षीय नंदुलाल याने रजनीकांत यांना विचारले की, “आता तुम्ही रिटायर लाईफ एन्जॉय करत आहात का?” त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की, “आता एका चित्रपटात काम करत आहे.” हे ऐकून तो खूप हैराण झाला आणि रजनीकांत यांना खूप प्रश्न विचारायला लागला.

त्यानंतर त्याने रजनीकांत यांना विचारले की, “आता तुम्ही कोणता चित्रपट करत आहात?” यावर रजनीकांत यांनी “रोबोट” असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी ऐश्वर्या रायचे नाव घेतले. त्यावेळी तो आश्चर्याने म्हणाला, “ऐश्वर्या? पण या चित्रपटाचा हिरो कोण असणार आहे?.” त्यावेळी रजनीकांत यांनी स्वतः या चित्रपटात काम करत असल्याची माहिती दिली. रजनीकांत यांनी सांगितले की, “जेव्हा त्याने मी या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत काम करणार आहे, हे ऐकले त्यावेळी तो खूप हैराण झाला आणि थोड्या वेळाने तेथून निघून गेला.”

रजनीकांत आणि ऐश्वर्या राय हे दोघेही लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विशेष म्हणजे सन १९९१ साली आलेल्या ‘हम’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समर सिंगच्या नवीन गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ; पाहायला मिळाला नीलम गिरीचा हॉट अंदाज

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा