बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील अभिनेत्री आणि लेखिका असणारी सुचित्रा कृष्णमूर्ती सध्या तिच्या आत्मचरित्रामुळे कमालीची लाइमलाईट्मधे आली आहे. त्याच्या या पुस्तकात अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. नुकताच तिने एक खुलासा केला की तिने चक्क दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना लग्नाची मागणी घातली होती, परंतु त्यांनी ती नाकारत त्याचे विचित्र कारण सांगितले.
सुचित्राने तिच्या आत्मचरित्रात स्पष्ट केले की, एकदा तिने चक्क मेसेज पाठवत दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना “तू माझ्याशी लग्न करशील का?” असा प्रश्न विचारत लग्नाची मागणी घातली होती. सुचित्रा आणि वर्मा यांनी ‘माय वाईफ्स मर्डर’ आणि ‘रण’ या चित्रपटात सोबत काम केले होते. या मागणीला राम गोपाल वर्मा यांनी मात्र थेट नकार दिला होता.
सुचित्राच्या त्या मेसेजला उत्तर देताना राम गोपाल वर्मांनी म्हटले होते, “सुचित्रा मला नाही वाटत की आपल्यामध्ये कोणतेही साम्य आहे. तुला मला घेऊन गैरसमज झाला आहे. लग्नावर किंवा लग्न संस्थेवर माझा अजिबात विश्वास नाही. मी स्त्रियांचा वापर फक्त संभोगासाठी करतो. मला त्यांचे शरीर आवडते मात्र त्यांना असलेला मेंदू आवडत नाही. माझ्या वाटते की, स्त्रियांना फक्त पाहावे, त्यांना ऐकू नये, त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहा.”
मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुचित्राने यावर भाष्य केले आहे. यावेळी सुचित्राने स्पष्ट केले की, तिने घातलेली ही लग्नाची मागणी एक मस्करी होती. ती म्हणाली, “राम गोपाल वर्मा यांच्याशी लग्न करण्याचा विचार कोणी करूच शकत नाही. ते चांगले असले तरी ते माझ्या मेसेजला घाबरले आणि खूप गांभीर्याने त्यांनी माझा मेसेजचा विचार केला होता. पुढे त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून सांगितले की मी चांगली मुलगी असून, ते माझ्यासाठी योग्य नाही. मी या गोष्टींचा विचार करू नये.” त्यानंतर तिने ती त्यांची मजा घेत असल्याचे सांगितले होते.
अधिक वाचा-
– सुयश टिळकची पत्नी ‘या’ हिंदी मालिकेत करणार एण्ट्री; आयुषी म्हणाली…
–काळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील जान्हवीचा हटके लूक व्हायरल