Thursday, September 28, 2023

सुयश टिळकची पत्नी ‘या’ हिंदी मालिकेत करणार एण्ट्री; आयुषी म्हणाली…

का रे दुरावा‘ या मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे सुयश टिळक होय. सुयश सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. त्याने प्रसिद्ध अभिनेत्री आयुषी भावे हिच्या सोबत विवाह केला आहे. आयुषी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक उत्तम डान्सर देखील आहे. आयुषी आता प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

आयुषी (Aayushi Bhave) झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ कार्यक्रमात देखील झळकली होती. आयुषी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आयुषीच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली तर खूप सारे डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात. यासोबतच आयुषी लवकरच एका हिंदी मालिकेत झळकणार आहे. आयुषीचा एक लावणी व्हिडीओ युट्युबवर खूप प्रसिद्ध आहे. त्यात आयुषी ‘या गावाचं की त्या गावाचं’ गाण्यावर डान्स करताना दिसते.

गेल्या काही दिवसांपासून बालकलाकार मायरा वायकुळच्या मालिकेची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. या मालिकेच नाव ‘नीरजा – एक नई पहचान’ हे आहे. ही मालिका ‘हिंदी कलर्स’वर सुरू आहे. या मालिकेत आयुषी भावे एक म्हत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेतील नीरजा मोठी झाल्यावर प्रेक्षकांना या भूमिकेत अभिनेत्री आस्था शर्मा दिसणार आहे.

मालिकेत ‘नीरजा’ मोठी झाल्यावर आयुषीची एण्ट्री होणार आहे. ती मालिकेत ‘मुनमुन’ हे नीरजाच्या वहिनीचे पात्र साकारताना दिसणार आहे. ‘मुनमुन’ चे पात्र विनोदी आणि नकारात्मक असणार आहे. पण प्रत्यक्षात ती खूप हुशार असते. नीरजा आणि अबीर यांच्या प्रेमकहाणीत अडथळे आणण्याचे काम मुनमुन करणार आहे. किचन पॉलिटिक्स, घरातील सत्ता कोणाकडे जाणार? यामध्ये मुनमुन सहभागी असणार आहे, ‘नीरजा – एक नई पहचान’ या मालिकेबाबत आयुषी खूप उत्सुक असल्याचे तिने सांगितले आहे. (Ayushi Bhave, wife of Suyash Tilak, will enter the Hindi serial ‘Neerja Ek Nai Izhan’)

अधिक वाचा- 
काळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील जान्हवीचा हटके लूक व्हायरल
‘दादूस लई झ्याक दिस्तोयास…’ अभिनेता संतोष जुवेकरच्या ‘त्या’ पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा