Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जेव्हा रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांचे ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर फुटले होते वादाला तोंड

सध्या रणबीर कपूर त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही नवराबायकोची जोडी मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत. थोड्या काळापूर्वीच आलिया आणि रणबीर यांनी लग्न केले. अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेयरच्या बातम्या मीडियामध्ये रंगताना दिसत होत्या. आलियासोबत लग्न करण्याआधी रणबीर कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. दीपिका पदुकोणपासून कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा, नर्गिस फाखरीपर्यंत अनेक मोठ्या अभिनेत्रीचा या यादीत समावेश आहे. यासोबतच या यादीमध्ये एक नाव असेही होते ज्यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले होते आणि ते नाव होते पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. शाहरुख खानसोबत ‘रईस’ या सिनेमातून माहिराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रणबीर आणि माहिरा यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचे २०१७ साली काही फोटो मीडियामध्ये आले, ज्या फोटोनी मोठ्या प्रमाणावर बज निर्माण केला. या फोटोंमध्ये रणबीर आणि माहिरा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सिगरेट पिताना दिसले. या फोटोंवरून दोघांना जबरदस्त ट्रोल देखील केले गेले. एवढेच नाही तर माहिराच्या फोटोमध्ये असलेल्या कपड्यांवरून पाकिस्तानमध्ये मोठ्या वादाला देखील तोंड फुटले होते. हे फोटो समोर आल्यानंतर माहिरा आणि रणबीर एकमेकांना डेट करत असल्याचा दावा देखील मीडियामध्ये केला गेला. मात्र या दोघांनी कधीच मीडियासमोर त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाही.

मात्र यासर्व प्रकरणावर रणबीर कपूरने त्याची प्रतिक्रिया दिली होती. रणबीरने माहिराचा बचाव करताना म्हटले होते की, “मी मागील काही महिन्यांपूर्वी माहिराच्या उत्तम व्यक्तिमत्वाला समजून घेतले आहे. व्यक्ती म्हणून, तिच्या उपलब्धी पाहून आणि एक माणूस म्हणून मी तिचा आदर करतो. तिच्याबद्दल असे बोलणे आणि तिची परीक्षा करणे खूपच चुकीचे आहे. मुख्य म्हणजे एक महिला असल्यामुळे तिला समानतेच्या नजरेतून पाहण्यात येत आहे. मी विनंती करतो की अशी नकारात्मकता बंद करा आणि आयुष्य आनंदाने जगा आणि जगू द्या.”

तर यावर माहिराने प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “माझ्यासोबत असे पहिल्यांदा झाले आहे. जेव्हा मी एखाद्या वादात अडकली आहे. माझ्यासाठी हे सर्व हैराण करणारे होते. एकतर तुम्ही तुमच्या जीवनात एका नाजूक वळणावर असतात आणि दुसरीकडे तुमचे कोणी फोटो व्हायरल केले जातात ज्यामुळे नवीन वाद सुरु होतो. या वादावरून मला समजले की लोकं तुमच्यावर एवढे प्रेम करतात सन्मान देतात ते लोकं तुम्हाला काही गोष्टी करताना अजिबात बघू शकत नाही.” पुढे ते सांगितले होते की, हा मुद्दा एवढा खेचणे खूपच चुकीचे आणि बालिश होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा