बॉलिवूडमध्ये आपण अशा अनेक जोड्या पाहिल्या आहेत, ज्या यशस्वी आणि अयशस्वीही ठरल्यात. तसं सांगायचं झालं, तर ठरावीक अशा काही जोड्या असतात, ज्यामुळे चित्रपट सुपरहिट होतो किंवा ती जोडी कोणत्याही चित्रपटात झळकली, तरी तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होणारंच. याची खात्री त्यांच्या चाहत्यांना असतेच असते. आता अशाच एका हिट जोडीने प्रेक्षकांना वेडं करून सोडलं होतं. एवढंच नाही, तर त्या जोडीबद्दल जिकडे- तिकडे चर्चा देखील होऊ लागली होती. सर्वांना वाटू लागलं होतं की, ही जोडी चित्रपटात एकत्र असते आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र राहतील. पण काही कारणावरून ते दोघं कायमचेच विभक्त झाले. ती फेमस जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. या दोघांमध्ये असं काय झालं की, ज्यामुळे त्यांनी पुन्हा एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला.
सत्तरच्या दशकात अमिताभ आणि रेखा या भन्नाट जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. जसे की, ‘सुहाग’, ‘गंगा की सौगंध’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘नमक हलाल’, ‘दो अनजाने’ आणि असे बरेच. हे सर्व चित्रपट नक्कीच पाहिले पाहिजेत. याचदरम्यान अमिताभ आणि रेखांचा एक चित्रपट आला होता, तो म्हणजे ‘मुक्कदर का सिकंदर’. हा चित्रपट तर सुपरहिट झालाच, तसेच त्यातील गाणीही सुपरहिट आहेत. या सदाबहार चित्रपटातील अमिताभ आणि रेखांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली होती. हाच तो चित्रपट, ज्यादरम्यान झाला होता एक किस्सा, ज्यामुळे अमिताभ यांनी रेखांसोबत काम न करण्याची शप्पथ खाल्ली होती.
‘मुक्कदर का सिकंदर’ या चित्रपटाचा प्रीमियर ठेवला होता, त्यावेळेस अमिताभ बच्चन हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत तिथे गेले होते. त्यावेळी अमिताभ यांची पत्नी जया बच्चन आणि आई-वडील देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे तिथे रेखा सुद्धा आल्या होत्या. या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान त्या एका रूममध्ये बसल्या होत्या. जिथून त्यांना जया आणि अमिताभ बच्चन हे एकदम क्लिअर दिसत होते. पण त्यांना रेखा नीट दिसत नव्हत्या. जेव्हा तो चित्रपट चालू होता आणि जेव्हा त्या चित्रपटात त्या दोघांचे रोमँटिक सीन्स चालू होते, तेव्हा रेखा बघत होत्या की, ज्यावेळेस त्यांचे आणि अमिताभ यांचे सीन सुरू होते त्यावेळेस जया बच्चन यांच्या डोळ्यांतून पाणी येत होतं आणि त्या स्वतःला सांभाळू शकल्या नाही. रेखाने खुद्द त्यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितलं होतं की, त्यांनी त्या रूममधून जया बच्चन यांना रडताना पाहिलं. याच मुद्द्यावरून जया बच्चन यांनी अमिताभ यांना सांगितले की, त्यांनी इथून पुढे रेखासोबत काम करायचं नाही.
पण करणार तरी काय. इंडस्ट्रीतील एवढी मोठी हिट जोडी म्हटल्यावर त्यांनी आधीच काही चित्रपट साईन केले होते. त्यामुळे त्यांनी या चित्रपटांमध्ये काम केले. पण जया बच्चन यांनी सांगितले की, इथून पुढे त्यांच्यासोबत कोणताही नवीन चित्रपट साईन करायचा नाही.
चित्रपटाच्या प्रीमियरनंतर रेखांना असं समजलं की, अमिताभ यांनी सर्व प्रोड्युसर्सला सांगितलंय की, ते रेखासोबत कोणत्याच चित्रपटात काम करणार नाहीत. अमिताभ यांनी ही गोष्ट डिरेक्टर, प्रोड्यूसर्सना सांगितली होती, पण रेखा यांना ही गोष्ट सांगितली नव्हती आणि रेखांना याचं कारण देखील माहित नव्हतं. त्यांनी अमिताभ याना विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण अमिताभ यांनी सांगितलं की, मी या गोष्टीवर काहीच बोलणार नाही. मला विचारू नको. आता अमिताभ यांच्या शब्दापुढे जातील त्या रेखा कसल्या. त्यांनीही नंतर अमिताभ यांना यामागील कारण विचारलं नाही. पण त्यांना कळून चुकलं होतं की, अमिताभ यांनी हे का केले आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे.
रेखांनीही समजून घेतलं आणि अमिताभ हे त्यांच्या निर्णयावर पक्के ठरले. हेच ते कारण बघा मंडळी. ज्यामुळे अमिताभ यांनी रेखासोबत काम न करण्याची शप्पथ खाल्ली होती.
मात्र, यश चोप्रा यांच्या सांगण्यावरून ही जोडी पुन्हा एकदा ‘सिलसिला’ या सिनेमात पाहायला मिळाली होती. पण पण पण. या चित्रपटासाठी कडक नियम बनवले होते. जया बच्चन यांच्याही काही अटी-शर्ती होत्या. त्यानुसार या चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि जया यांनी एकमेकांशी चर्चाही केली नव्हती.
हेही पाहा- …आणि जयाला रडताना पाहून अमिताभ यांनी घेतली ‘ती’ मोठी शप्पथ
तर मंडळी ‘मुक्कदर का सिकंदर’ चित्रपटाचा प्रीमिअरच होता, जेव्हा रेखांच्या म्हणण्यानुसार, जया यांनी अमिताभ यांना रेखांसोबत काम करण्यास रोखले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-










