Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड सर्वांसमोर अचानक कॅटरिना कैफचा ड्रेस खिसकताच ‘भाईजान’ने केलं असं काही; पाहा व्हिडिओ

सर्वांसमोर अचानक कॅटरिना कैफचा ड्रेस खिसकताच ‘भाईजान’ने केलं असं काही; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थातच अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफची जोडी चांगलीच पसंती केली जाते. सलमान बर्‍याचदा कॅटरिनावर प्रेम व्यक्त करताना दिसतो. सध्या त्यांचा एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेता कॅटरिना कैफला ड्रेस ठीक करण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ २०१७ च्या आयफा पत्रकार परिषदेदरम्यानचा आहे.

वास्तविक, या इव्हेंटमध्ये कॅटरिनाने डीप नेक ड्रेस घातला होता. संपूर्ण इव्हेंटमध्ये सलमानची नजर पूर्णपणे कॅटरिनाच्या ड्रेसवरच होती. जेव्हा तिच्या ड्रेसचा नेक थोडा अधिक डीप दिसू लागला, तेव्हा सलमानने कॅटरिनाला आपला ड्रेस ठीक करण्यास सांगितले. सलमानने तिथे सर्वांसमोर तिला ड्रेस व्यवस्थित करण्याचा इशारा केला. सलमानचा असा इशारा पाहून कॅटरिना जरा अस्वस्थ झाली. ती लगेचच हसत हसत मागे वळाली आणि आपला ड्रेस ठीक केला.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, चाहत्यांनी सलमानचे खूप कौतुक केले होते. अनेक चाहत्यांनी सलमानला ‘जंटलमॅन’ म्हटले होते. अशामध्ये, आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. सलमानचे चाहते सोशल मीडियावर हा व्हिडिओ पुन्हा शेअर करताना दिसत आहेत.

एवढेच नव्हे, तर सलमानने आलिया भट्टला देखील, तिचा कट ड्रेस इशाऱ्यामध्ये ठीक करण्यास सांगितल्याचे पाहायला मिळाले आहे. या पत्रकार परिषदेत दोघांव्यतिरिक्त आलिया भट्टही उपस्थित होती.

जेव्हा या तिघांना कॅमेऱ्यासाठी पोज देण्यास सांगितले गेले, तेव्हा सलमान या दोन्ही अभिनेत्रींसमवेत उभा राहिला. सलमानने आपले हात दोघींच्या पाठीमागे करत, कॅमेर्‍यासाठी पोज दिला. कॅटरिनानेही आपला एक हात सलमानच्या मागे ठेवला होता. पण जेव्हा आलियानेसुद्धा हे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कॅटरिनाने सर्वांसमोर आपला हात काढला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनू सूदच्या घराबाहेर मदतीसाठी लोकांची गर्दी, कौतुक करत चाहतेे म्हणाले ‘तो हनुमान आहे’

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

-लय भारी! अभिनेता सोनू सूदच्या टीमने वाचवले बंगळुरूमधील २२ कोरोना रुग्णांचे जीव, रात्रभर केला ऑक्सिजनचा पुरवठा

हे देखील वाचा