आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

Breakup reason of deepika padukone and siddharth Malya


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील एक सुपरहिट कपल आहेत. बॉलिवूडमधील पार्टी असो किंवा आणखी काही असो, ते दोघे नेहमीच एकमेकांसोबत असतात. रणवीर सिंगच्या आधी दीपिका पदुकोण ही रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्ल्याला डेट करत होती. अगदी डिनर डेटपासून ते आयपीएलच्या मॅचपर्यंत नेहमीच स्पॉट केले जाणारे दीपिका आणि सिद्धार्थ हे त्या काळचे एक प्रसिद्ध जोडपे होते. परंतु जेव्हा त्या दोघांचे ब्रेकअप झाले, तेव्हा मात्र त्यांनी एकमेकांवर खूप चिखलफेक केली होती. यामध्ये मग त्यांनी दिलेल्या महागड्या गिफ्टचा देखील उल्लेख झाला होता.

सिद्धार्थ हा विजय मल्ल्याचा मुलगा आहे. त्याची लाईफ स्टाईल पाहून त्यावेळी अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या. परंतु ज्यावेळी दीपिका आणि सिद्धार्थचे ब्रेकअप झाले, तेव्हा दीपिकाने केलेल्या वक्तव्याने सगळेच हैराण झाले होते. ब्रेकअपनंतर तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे ब्रेकअप नक्की कोणत्या कारणाने झाले आहे.

दीपिका आणि सिद्धार्थ दोन वर्ष रिलेशनमध्ये होते. 2011 मध्ये झालेल्या आयपीएल मॅचमध्ये ते नेहमीच एकत्र असायचे. त्यावेळी त्या दोघांच्या प्रेमाची कहाणी सर्वत्र पसरली होती. मॅचच्या दरम्यान सिद्धार्थ आणि दीपिकाने सर्वांच्या समोर किस केले होते.

या सगळ्या गोष्टी संपूर्ण जगासमोर झाल्यानंतर दीपिका आणि सिद्धार्थचे ब्रेकअप झाले आहे या बातमीने सगळेच हैराण झाले होते. एका मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की, “मी सिद्धार्थसोबत नाते टिकवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण मागील काही दिवसांपासून त्याचे वागणे खूप बदलले होते. आम्ही शेवटचे डिनर डेटसाठी गेलो होतो, तेव्हा देखील काहीच ठीक नव्हते. आमचे नाते खूप वाईट परिस्थितीत होते.”

दीपिकाने पुढे सांगितले की, तिच्याकडे ते नाते तोडण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता. तिने सांगितले की, “जेव्हा एखाद्या नात्यामध्ये काहीच राहत नाही, तेव्हा त्या नात्यापासून लांब गेलेले कधीही चांगले. ना प्रेम ना सन्मान. जेव्हा या सगळ्या गोष्टी संपतात, तेव्हा तुमच्याकडे ब्रेकअप हा एकमात्र पर्याय शिल्लक राहतो.”

जेव्हा सिद्धार्थला हा प्रश्न विचारला, तेव्हा तो जास्त काहीच बोलला नाही. त्याने फक्त सांगितले की, दीपिका एक वेडी मुलगी होती. त्या दोघांच्या ब्रेकअप बद्दल त्याने कधीच काही सांगितले नाही. त्याने फक्त त्याला एका क्रेझी लव्ह स्टोरीचे नाव दिले होते. पण जेव्हा दीपिकाने तिच्या आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, तेव्हा सिद्धार्थने त्यावर हार्टची ईमोजी पोस्ट करून कमेंट केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्या गायिकेच्या गाण्यांना यूट्यूबवर १ बिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेत, तिला कपडे धुताना पाहिलंय का? एकदा पाहाच

-बंगाल हिंसेवर ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतने रडत रडत दु: ख केले व्यक्त, सरकारकडे केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

-एकदम कडक! युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने चाहत्यांना शिकवला ‘सपने में मिलती है’ गाण्यावर डान्स, थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.