संजय दत्तच्या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान, वडील सुनील दत्त यांनी रिकामी ठेवली होती एक सीट; कारण वाचून तुम्हीही व्हाल भावुक!

bollywood when sanjay dutt and sunil dutt left a seat vacant for for this reason on rocky premiere


शुक्रवारी (८ मे) ‘रॉकी’ या चित्रपटाला तब्बल ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडचे दिवंगत कलाकार नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तने याच चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या खास निमित्ताने एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ब्लॅक एँड व्हाईट फोटोमध्ये सुनील दत्त आणि संजय दत्त आपापसात बोलताना दिसत आहेत. मात्र, या दोघांमधील मोकळी सीट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

खरं तर हा फोटो सुपरस्टार संजय दत्तच्या ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यानचा आहे. या निमित्ताने वडील आणि मुलाने त्यांच्या दोघांमध्ये एक सीट रिकामी ठेवली आहे, ज्याचे कारण अत्यंत भावनिक आहे. संजय दत्तचा पहिला चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच, त्याची आई नर्गिस दत्तने या जगाचा निरोप घेतला होता. संजय दत्तने ही जागा आईसाठी रिक्त ठेवली होती. संजू बाबाचा असा विश्वास होता की, त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या निमित्ताने, त्याची आई त्याला आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच येईल.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री नर्गिस दत्त, सन १९८० मध्ये कर्करोगाने ग्रस्त झाल्या होत्या. नर्गिस यांचे त्यांचा मुलगा संजूवर खूप प्रेम होते आणि मुलाचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ पाहण्याची संधी मिळावी, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण नशिबाला हे मान्य नव्हते. ‘रॉकी’ चित्रपटाच्या प्रीमिअरच्या काही दिवस आधी नर्गिस यांनी जगाला निरोप दिला होता. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या नर्गिस यांनी ३ मे, १९८१ रोजी अखेरचा श्वास घेतला. हे समजले जाऊ शकते की, मुलगा आणि पतीसाठी ही वेळ किती वेदनादायक असेल.

अलीकडेच संजय दत्तने त्याच्या आईच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त नर्गिस यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून लिहिले होते की, “असा एकही दिवस नसेल, जेव्हा मला तुझी आठवण येत नाही.” यापूर्वी संजय दत्तने आपल्या आईच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्तही एक थ्रोबॅक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

याशिवाय संजय दत्तचा ‘रॉकी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी केले होते. या चित्रपटामध्ये संजय दत्तसह टीना मुनीम, अमजद खान, शम्मी कपूर, राखी, रीना रॉय असे दिग्गज कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र


Leave A Reply

Your email address will not be published.