आजारी पत्नीला संजय दत्तने दिला होता धोका, ‘या’ मराठी अभिनेत्रीबरोबर सुरु होते अफेअर!


संजय दत्त बॉलिवूडचा आणि त्याच्या फॅन्सचा ‘बाबा’. संजयचे जीवन म्हणजे सर्वांसाठीच आता खुली किताब झाले आहे. संजयच्या आयुष्यामध्ये आलेले चढाव-उतार पाहून कोणत्याही निर्मात्या, दिग्दर्शकाला त्याच्या जीवनावर सिनेमा तयार करण्याचा मोह नक्कीच होणार. हाच मोह राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांना देखील झाला, आणि त्यातून तयार झाला ‘संजू’ हा सुपरहिट सिनेमा.

हा सिनेमा जरी संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असला तरी, यात अगदी मोजक्याचा घटना दाखवल्या गेल्या आहेत. त्या घटनांनाव्यतिरिक्त देखील अशा अनेक गोष्टी आहे, ज्या अजून बऱ्याच जणांना माहित नाही. संजय दत्तने स्वतः मान्य केले की, त्याचे ३०० पेक्षा अधिक मुलींसोबत संबंध होते. त्यातल्या तीन मुलींशी संजयचे लग्न झाले. संजयने पहिले लग्न केले ते अभिनेत्री रिचा शर्मासोबत. १९८७ साली संजय आणि रिचाने लग्न केले.

रिचाने लग्नाच्या ९ वर्षांनी या जगाचा निरोप घेतला. रिचाचे भलेही ब्रेन ट्युमरमुळे निधन झाले असले, तरी या आजारांच्या दरम्यान ती मानसिकरित्या काही बातम्यांमुळे पूर्णपणे खचली होती. ज्यांमुळे ती इच्छा असूनही बरी होत नव्हती.

रिचाचा जन्म ६ ऑगस्ट १९६३ ला न्यूयॉर्कमध्ये झाला. अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगून रिचा भारतात आली.
संघर्षाच्या काळात रिचाने अनेक फोटोशूट केले होते. ती काही मासिकांच्या मुखपृष्ठावर देखील झळकली. त्यातल्याच एका मासिकावर रिचाचा फोटो पाहून संजय तिच्या प्रेमात पडला. त्यावेळी रिचा ‘आग ही आग’ सिनेमाची शूटिंग करत होती. पुढे या दोघांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले.

मात्र करियरच्या सुरुवातीलाच रिचा संजय दत्तच्या प्रेमात पडली. संजयने तिला लग्नासाठी प्रपोज केले. रिचा तयार तर झाली मात्र रिचाने लग्नानंतर सिनेमांमध्ये काम करू नये, अशी संजयची इच्छा होती आणि करियरपेक्षा जास्त संजयला महत्व देऊन तिने संजयसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने चित्रपटांना अलविदा म्हटले आणि संसारात व्यस्त झाली.

१९८७ साली त्यांचे लग्न झाले. पुढच्याच वर्षी संजय, रिचा आई बाबा झाले आणि त्रिशालाचा जन्म झाला. त्यांचे हे तीन सदस्यीय कुटुंब खूप आनंदी होते. मात्र मुलीच्या जन्मानंतर काही काळातच रिचाला ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाले. या आजाराच्या उपचारासाठी रिचाला संजयने न्यूयॉर्कला नेले. संजय शूटिंगसाठी पुन्हा भारतात आला.
संजय रिचा दुरावल्यामुळे दोघेही विरहात होते. त्यात संजयला रिचाच्या आजाराचे देखील टेन्शन होते.

यातच तो आणि माधुरी ‘थानेदार’ चित्रपटाची शूटिंग करत होते, त्यातच माधुरी आणि संजयच्या अफेयरच्या बातम्या यायला सुरुवात झाली. असे म्हटले जाते की, माधुरीच्या प्रेमात पडल्यावर संजयने रिचाकडे लक्ष देणे सोडून दिले. रिचापासून शरीराने दूर असलेले संजय, आता मनानेही दूर गेला होता. यातच रिचाची तब्येत ठीक होत होती. रिचाने पुन्हा भारतात येऊन संजयसोबत नवीन आयुष्य सुरु करण्याचे ठरवले. मात्र तो पर्यंत बराच उशीर झाला होता. संजयच्या जीवनात माधुरीने एन्ट्री केली होती.

रिचाच्या बहिणीने ऍनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ” रिचाने भारतात येण्याआधी दोन फोन करून संजयला ती येत असल्याचे सांगितले होते. मात्र तरीही संजय तिला घ्यायला एअरपोर्टवर गेला नाही. रिचा भारतात परतली आणि पुन्हा सर्व नीट होईल या आशेने राहू लागली, त्याच दरम्यान तिला जाणवायला लागले की, आता पुन्हा संजय तिच्या जवळ येऊ शकत नाही. १५ दिवसातच रिचा पुन्हा न्यूयॉर्कला परतली. परत गेल्यावर रिचाला पुन्हा ब्रेन ट्युमर झाला. त्यातच १० सप्टेंबर १९९६ ला तिचे निधन झाले. शेवटच्या दिवसांमध्ये संजयची आणि तिची भेट देखील झाली नाही.”

तर दुसरीकडे संजयने सांगितले की, ” माझ्यावर लावलेले आरोप साफ खोटे होते. माझे आणि रिचाचे लग्न तुटण्याचे कारण, रिचाचे कुटुंब आणि तिची बहीण ऍना होती. त्यांनी आमच्या आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त ढवळाढवळ केली आणि आमचे नाते तुटले.

रिचाचे निधन झाले तेव्हा त्रिशाला ८ वर्षांची होते. पुढे तिला तिच्या आजी आजोबानी सांभाळले. ते न्यूयॉर्कमध्येच राहतात. त्रिशालाने क्रिमिनल लॉमध्ये पदवी संपादन केली असून, आजही त्रिशाला आणि संजयची भेट होत असते.


Leave A Reply

Your email address will not be published.