संजय दत्त बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ नेहमीच त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणूनही त्याला मोठी ओळख आहे. एकापेक्षा एक सरस भूमिका साकारून संजयने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केले. आज संजू बाबाचा अंदाज, त्याचे व्यक्तिमत्व सर्वच लोकांना त्याची दखल घ्यायला लावते. त्याने त्याच्या करिअरमध्ये सर्वच प्रकारच्या भूमिका साकारल्या. संजू बाबा जस चित्रपटांमध्ये खलनायक साकारताना संजयची दबंग बाजू सर्वांसमोर आली असली तरी तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही एकदम दबंग अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याला जवळून ओळखणाऱ्या लोकांमध्ये त्याची ही विशेष ओळख आहे. खुद्द सलमान खानला देखील त्याच्या या दबंग अवताराचा अनुभव आला आहे. याचाच एक किस्सा जाणून घेऊया.
सलमान खान आणि संजय दत्त यांच्यामध्ये खूपच जुने आणि खोल नाते आहे. दोघेही नेहमीच एकमेकांचा आदर करताना दिसतात. चित्रपटांमध्ये सोबत काम करण्याआधीपासूनच त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबाचे देखील एकमेकांशी चांगले संबंध आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा सलमान खानचे स्टारडम संजय दत्तपेक्षा जास्त झाले, आणि सलमान बॉलिवूडमध्ये त्याच्या या स्टारडमचा फायदा घेत दबंगगिरी करू लागला. सलमानच्या या दबंगगिरीमध्ये संजयचे काही जवळचे लोकं देखील आले. हे जेव्हा संजयला समजले तेव्हा तो मध्यरात्री सलमानच्या घरी त्याला मारायला पोहचला होता.
संजय दत्तचा अजून एक किस्सा श्रीदेवी आणि संजय दत्त यांचा प्रसिद्ध आहे. या दोघांनी ‘गुमराह’ सिनेमात एकत्र सोबत काम केले आहे. सिनेमाच्या सेटवर संजय नेहमीच श्रीदेवी यांच्या मागे पडलेले असायचे. त्याला त्रास देणे, त्याची छेड काढणे यासाठी संजय फक्त संधीच्या शोधत असायचा. मात्र श्रीदेवी यांनी ही संधी त्याला कधी दिलीच नाही.
मुन्नाभाई एम.बी.बी.एस सिनेमात जेव्हा विधू विनोद चोप्रा यांनी संजयला साइन केले तेव्हा त्याला दिग्दर्शक म्हणून राजू हिरानी नको होता. मात्र चोप्रा यांनी त्याला समजावले आणि तो तयार झाला. सेटवर हिरानी यांची शॉट घेण्याची पद्धत, कॅमेरा अँगल आदी अनेक गोष्टी संजयला खटकत होत्या. मात्र असे असूनही तो काम करत होता, पुढे त्यालाच त्याची चूक उमगली आणि सिनेमा हिट झाल्यावर त्याने राजू हिराणीची माफी देखील मागितली.
बॉलिवूडमध्ये संजय दत्तचे असंख्य मित्र आहेत, मात्र तो सर्वात जास्त करण जोहरला मानतो. याचे कारण म्हणजे जेव्हा संजय दत्तला पहिल्यांदा अटक झाली, तेव्हा करण जोहरच्या वडिलांनी यश जोहर यांनी संजयला सोडवण्यासाठी खूपच मदत केली. लवकरच संजय दत्तचा ‘केजीएफ चॅप्टर २’ सिनेमा प्रदर्शित होत असून, या सिनेमात संजयने ‘अधिरा’ नावाचा खलनायक रंगवला असून, हा अधिरा नायकापेक्षा जास्त खतरनाक आहे. चित्रपटात यश मुख्य भूमिकेत असून, हा सिनेमा २०१९ साली आलेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाचा पुढचा भाग आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा