हरियाणाची सुपर डान्सर सपना चौधरीला (Sapana Choudhary) हरियाणाची शान म्हणून ओळखले जाते. सपना बिग बॉसमध्येसुद्धा झळकली होती. यावेळी तिने आपल्या दमदार डान्सने सगळ्यांची मने जिंकली होती. सपना तिच्या डान्समुळे आणि रागीट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते, असाच तिचा एक जुना व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
अलीकडेच एका शोदरम्यान सपना चौधरीची तब्येत बिघडली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सपना चौधरीने राम-राम म्हणत स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. ती लवकरच पुनरागमन करेल अशी आशा आहे. त्याआधी, सपनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती लाईव्ह शो दरम्यान लोकांवर संतापलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये सपना चौधरी लोकांना टाळ्या वाजवू नका असे सांगताना दिसत आहे. नंतर कोणी मार खाल्ला तर लोक म्हणतात की, सपनामुळे झालं.मी येण्यापूर्वी हरियाणात डान्स नव्हता का असे ती म्हणत आहे. यादरम्यान सपनाने उपस्थित लोकांना प्रश्न केला की, “मुली जेव्हा बॅकलेस लेहेंगा घालून नाचत असतात. तेव्हा संस्कार कुठे होते? आज मी सूट घालून नाचतेय, म्हणून तुम्हाला संस्कार आठवत आहेत का?”
या शो दरम्यान सपना चौधरी खूप रागात दिसली. “मी नृत्य आणि गाणे सोडून देईन,” असेही तिने ठणकावून सांगितले. फक्त माणसाने सांगावं की तो त्याची कमाई माझ्या घरी देऊन निघून जाईल. माझ्या घरी कोण देणार आणि कमावणार ते सांगा, असे म्हणत माईक हातात घेऊन सपना चौधरी वारंवार प्रश्न विचारत राहिली. मात्र सगळ्यांनी यावर गप्प राहणे पसंत केले. दरम्यान सपना चौधरी ही अशा स्टार्सपैकी एक आहे जिने संघर्ष करून खूप मोठा पल्ला गाठला आहे. काहींनी तिचा डान्स सन्मान म्हणून पाहिला तर काहींनी प्रश्नही उपस्थित केले. कुणाला काहीही नाव ठेवणे सोपं असतं, पण काहीतरी करणं तितकंच अवघड असतं. असेही ती म्हणते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा