सपना चौधरीला टक्कर द्यायला आली चिमुकली, तिचे ठुमके पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकम झक्कास’


हरयाणवी डान्सर सपना चौधरी आता जरी लाईव्ह परफॉर्मन्स देत नसली, तरी तिच्या डान्सची चर्चा आजही रसिक प्रेक्षकांमध्ये सुरूच असते. अशात सध्या तिच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सपनाचा हॉट डान्स पाहायला मिळत आहे. तसेच तिने यामध्ये सोनेरी आणि लाल रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की चाहत्यांची किती गर्दी जमा झालेली आहे. छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक चाहते तिच्या डान्सचा आनंद घेत आहेत. तसेच यामध्ये एक छोटी मुलगी मध्येच स्टेजवर येते आणि सपनाप्रमाणे ठुमके मारू लागते. सपना देखील तिच्याबरोबर ठेका धरते. त्यांनतर ही चिमुरडी उपस्थित सर्व प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेते.

या व्हिडिओला आतापर्यंत १४ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याव्यतिरिक्त या व्हिडिओवर ३ लाख ४४ हजार लाईक्स आणि ९७ हजार कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.

सपनाने सुरुवातीला अशाचप्रकारे स्टेज परफॉर्मन्स करून नाव कमावले होते. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर तिने विशेष पसंती मिळवली. सध्या ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहत असतात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या मृत्यूची एक अफवा व्हायरल होत होती. त्यावेळी तिने सर्वांना प्रखर शब्दांत उत्तर दिले होते. परंतु ती आता लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली होती की, “मला आता या सर्व अफवांमुळे काहीच फरक पडत नाही. या आधी देखील अनेकांनी माझ्या मृत्यूची अफवा पसरवलेली आहे. लोक मला कधी अपघातामध्ये, तर कधी गोळी लागून मारतात. माझ्या कुटुंबीयांना देखील आता अशा अफवांची सवय झाली आहे. आम्ही सर्वच याकडे दुर्लक्ष करतो.”

सपनाने साल २०१७ मध्ये ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वात सहभाग घेतला होता. तिने ‘नानू की जानू’, ‘वीरे की वेडिंग’, ‘जर्नी ऑफ भाँगओवर’, ‘एक तू एक मै’, ‘सपना चौधरी सॉन्ग लिस्ट’, ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ अशा चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्रिय मोदीजी अमेरिका दौऱ्यावरुन येताना माझ्यासाठी ‘या’ गोष्टी आणा’, राखी सावंतची पंतप्रधानांकडे अजब मागणी

-‘सहनशीलता आपल्याला स्ट्रॉंग बनवते’, म्हणत रिकव्हर होणाऱ्या शिल्पाने शेअर केली पोस्ट

-सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’


Leave A Reply

Your email address will not be published.